तरुण ठाणेकर साधतायत फिटनेस ‘गोल’

काहीच दिवसात पावसाला सुरुवात होईल. फुटबॉल हा खेळ पावसाळ्यात खेळायला मजा येते. सर्वच खेळाडूंचा कल या दिवसात फुटबॉलकडे असतो. फुटबॉल हा जागतिक पातळीवर खेळला जाणारा खेळ असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या खेळाला पसंती देतात. फुटबॉल हा खेळ सीमा, भाषा आणि संस्कृतींना ओलांडून लोकांना एकत्र जोडतो.

१९०४ साली पॅरिस येथे फ्रान्स, बेल्जीअम, नेदरलॅंड(हाॅलंड), डेन्मार्क, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांनी फेडरेशन इंटरनॅशनल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना स्थापन केली. इ.स. १८६३ साली फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबद्ध केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फिफा संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा फुटबॉल विश्वचषक ही आहे.

ठाण्यातील काही प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षण संस्था

यंग गन्स फुटबॉल अकॅडमी: 

ही अकॅडमी ठाण्यातील प्रसिद्ध फुटबॉल अकॅडमीपैकी एक आहे. 2012 साली या अकॅडमीची स्थापना झाली व सध्या सुमारे 350 ते 400 मुले येथे फुटबॉलचे प्रशिक्षण घेत आहेत. ठाण्यातील उपवन तलाव, राम मारुती रोड, बेडेकर कॉलेज, नौपाडा, बाळकुम इ. ठिकाणी या अकॅडमीचे प्रशिक्षण चालते. येथे 12 प्रशिक्षित व अनुभवी  प्रशिक्षक फुटबॉलचे प्रशिक्षण देतात. ठाण्यातील ही अकॅडमी मुंबई फुटबॉल सुपर डीव्हिजन मधील नावाजलेली अकॅडमी आहे. येथील अनेक खेळाडू फुटबॉल नॅशनल लीगचा भाग आहेत. येथील उच्चशिक्षित टेक्निकल डायरेक्टर लाँग टर्म व्हिजन ठरवून प्रत्येक खेळाडू घडवत असतात. ठाण्यात फुटबॉलची मैदाने कमी असल्याने या अकॅडमीच्या माध्यमतून अकॅडमीचा भाग नसलेल्या मुलांसाठी देखील मॅचेस व इव्हेंटसचे आयोजन करण्यात येते. ठाणेकरांचा या अकॅडमीला उत्तम प्रतिसाद मिळत असून दिवसेंदिवस ठाण्यातील फुटबॉलपटुंची संख्या वाढत आहे.

मी आता 19 वर्षांचा असून मी सहावीपासून फुटबॉल खेळत आहे. मला लहानपणीच फुटबॉलची आवड निर्माण झाली होती. माझ्यापेक्षा मोठ्या मुलांना त्यावेळी फुटबॉल खेळताना पाहायचो आणि त्यांना खेळताना पाहण्यात मला मजा यायची, त्या क्षणापासून मी देखील फुटबॉल प्लेअर व्हायचे ठरवले. या खेळाने मला नेतृत्व कौशल्य, टीमवर्क यासारख्या अनेक गोष्टी शिकवल्या. मी फुटबॉलच्या अनेक मॅचेस खेळलो आहे. प्रत्येक सामना वैयक्तिक खेळाडू म्हणून आणि संघाचा भाग म्हणून वाढ होण्यासाठी संधी आहे. मी शक्य तितके स्पर्धात्मक सामने खेळण्यासाठी उत्सुक आहे.
हेमांग जाधव
यंग गन्स फुटबॉल अकॅडमी.

मी मागील सात वर्ष यंग गन्स फुटबॉल अकॅडमी येथे फुटबॉलचे प्रशिक्षण देत आहे. मी मुंबई युनिव्हर्सिटीचा चॅम्पियन असून यंदाच्या नॅशनल फुटबॉल लीग साठी अनेक खेळाडुंना मी प्रशिक्षण दिलेलं आहे. फुटबॉल खेळासाठी वयोमर्यादा नसल्याने ह्या खेळाकडे हल्ली तरुणाईचा कल वाढताना दिसत आहे. फुटबॉलमुळे शरीर सुदृढ राहते. याचसोबत फुटबॉलचे अनेक फायदे आहेत. फुटबॉलमध्ये प्रामुख्याने मुलांचा सहभाग मुलींपेक्षा जास्त जाणवतो. मुलींनीसुद्धा फुटबॉल खेळाकडे वळले पाहिजे. फुटबॉलमध्ये तुम्ही उत्तम करियर देखील करू शकता. या खेळाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलत आहे त्यामुळे या खेळात करिअरच्या जास्त संधीही उपलब्ध होत आहेत. ठाणेकरांचा फुटबॉल प्रति कल उत्तम आहे व तो हळूहळू वाढत देखील आहे.
कुणाल गौरी
प्रशिक्षक, यंग गन्स फुटबॉल अकॅडमी

होप फुटबॉल अकॅडमी –

ठाण्यातील ही प्रसिद्ध फुटबॉल अकॅडमी २०१६ साली स्थापन करण्यात आली. सुरुवातीला सायन येथील प्रतीक्षा नगर येथे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना प्रशिक्षण देऊन अकादमी सुरू करण्यात आली. या अकॅडमीमध्ये सध्या एकूण २८६ मुले फुटबॉलचे प्रशिक्षण घेत आहेत. अनुभवी व कौशल्य असलेले व्यावसायिक प्रशिक्षक या अकॅडमीमध्ये आहेत. आठ प्रशिक्षकांचा संघ या अकॅडमीचा भाग आहे. ठाण्यातील हॅट्रिक टर्फ, नीलकंठ हाईट्स, नीलकंठ पाल्म्स येथे या अकॅडमीतर्फे प्रशिक्षण दिले जाते. त्याचसोबत ठाण्यातील राजश्री शाहू विद्यालय येथे या अकॅडमीच्या माध्यमातून अल्पदरात फुटबॉलचे प्रशिक्षण दिले जाते.

मी स्वतः फुटबॉलपटू असून ठाण्यातील होप फुटबॉल अकॅडमी येथे फुटबॉलचे प्रशिक्षण देत आहे. मी लहान असल्यापासून फुटबॉल खेळत आहे व आता फुटबॉलची करिअर म्हणून निवड केली आहे. हा खेळ प्रत्येकाने खेळला पाहिजे. फुटबॉल खेळाचे अनेक फायदे आहेत. मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते, नेतृत्व आणि मार्गदर्शन कौशल्य विकसित करते.
आकाश कहार
प्रशिक्षक, होप फुटबॉल अकॅडमी

मी लहानपणापासून फुटबॉल खेळायला सुरुवात केली. मी सहाव्या वर्षी पहिल्यांदा फुटबाल खेळलो. मला हा खेळ खूप आवडतो. या खेळामुळे माझी चपळता वाढली आहे. या खेळातून प्रसंगावधान आणि खिलाडूवृत्ती दिसून येते. या खेळाचा मला वैयक्तिक आयुष्यातही खूप फायदा झाला. मला होप फुटबॉल अकादमीमधून योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळत आहे. मी अधिकतर माझ्या सरावावर लक्ष केंद्रीत करतो. मला एक यशस्वी फुटबॉलपटू व्हायचे आहे. मी आतापर्यंत अनेक फुटबॉल मॅचेस मध्येही खेळलो आहे.
ग्याविन डिसूझा
खेळाडू, होप फुटबॉल अकॅडमी

तनिष्क स्पोर्ट्स 

ठाण्यातील या दुकानात फुटबॉलसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे. यात फुटबॉलचा बॉल, स्टोकिंग्ज, नॉर्मल व फर्स्ट कॉपी जर्सी, ट्रेनर व स्टडस् फुटबॉल शूज, शिनपॅड इ.चा समावेश आहे. कुठे – वसंतविहार, ठाणे

गणेश स्पोर्ट्स 

या दुकानात फुटबॉल खेळासाठी लागणारे सर्व साहित्य मिळते. यात विविध प्रकारचे फुटबॉल, जर्सी, स्टोकिंग्ज तसेच ट्रेनर व स्टडस् या प्रकारचे शूज येथे उपलब्ध आहेत.
कुठे –