मजिकियेन ब्रँडच्या माध्यमातून तन्वी यांनी जोपासली स्वतःची आवड

स्वतःची आवड जपून त्यातच व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती खूप कमी असतात. ठाण्यातील तन्वी डुंबरे यांनी आपली कलेची आवड जोपासत त्याचे व्यवसायात रूपांतर करून एक उत्कृष्ट फॅशन डिझाईन म्हणून नाव कमावले आहे.

शाळेपासूनच कलाविषयात रुची असलेल्या तन्वी डुंबरे यांनी वाणिज्य शाखेची निवड करून महाविद्यालयीन शिक्षण घेताना आपली आवड जपून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. तन्वी यांनी इटली येथून त्यांचे महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण केले. व्यवसायाबद्दल विचार मनात आल्यावर त्याविषयी शोध घेण्यास, नवीन कल्पना अस्तित्वात आणण्यास त्यांनी सुरुवात केली. वेस्टर्न पद्धतीचे कपडे तयार करून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर फास्ट सेल होतील असा व्यवसाय त्यांना सुरु करायचा होता. 2018 साली आजच्यासारखे ऑनलाईन कपडे खरेदी करण्याचा तितकासा ट्रेंड नव्हता. कारण त्यावेळी लोकांना फक्त ॲमेझॉन आणि झोमॅटो हेच ऑनलाईन ऍप्लिकेशन माहित होते. भारतात ऑनलाईन शॉपिंग हा ट्रेंड कोरोना काळानंतर सुरु झाला. तन्वी यांनी कोरोना काळाच्या आधीच त्यांचा ऑनलाईन व्यवसाय सुरु केला होता. 2018 च्या आधी माज़िकियेन(mazikien) या ब्रँडने स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी केली. मात्र लॉकडाऊननंतरच या व्यवसायाला जास्त यश मिळाले, परिणामी लोकप्रियता वाढली. तन्वी यांना परदेशातून अनेक संधी उपलब्ध होत्या, तरीसुद्धा स्वतःच्या देशात राहून स्वतःची ओळख असलेला ब्रँड तयार करणे त्यांना जास्त महत्त्वाचे व गरजेचे वाटले. Mazikien या ब्रँडच्या कपड्यांचे कापड हे सुरत, अहमदाबाद येथून मागवले जाते.

बाजारात प्रचलित असलेल्या झारा, एच. एन. एम या क्लोदिंग ब्रँड प्रमाणेच मजिकियेन ह्या ब्रँडच्या कपड्यांची क्वालिटी पाहायला मिळते. परंतु इतर प्रसिध्द ब्रँडच्या तुलनेत माफक व योग्य दरात या ब्रँडचे कपडे उपलब्ध आहेत. भारतीय बनावटीच्या या ब्रँडला परदेशातही घेऊन जाण्याचे स्वप्न तन्वी डुंबरे या साकारत आहेत. दुबई, सिंगापूर सारख्या अनेक देशांमध्ये या ब्रँडची मागणी वाढत असून भारतीय बनावटीच्या कॉटन, खादी प्रमाणे अनेक प्रकार चर्चेत आलेले आहेत.

तन्वी या इटली येथे राहिल्यामुळे त्यांना इटॅलियन आणि इंडियन हे दोन्ही फॅशन सेन्स आवडतात. त्याबरोबरच तन्वी यांना ट्रेडिशनल आणि मॉडर्न हे दोन्ही फॅशन स्टाईल्सही आवडतात. दोन्ही स्टाईल्स हे आपापल्या जागेवर शोभतील असे आहेत. परंतु आताच्या ट्रेंड्स नुसार वेस्टर्न वेअर ही एक अशी गोष्ट आहे जी खूप वेगाने पुढे जात आहे. इंडियन वेअर ही भारताची शान असून ती एक अशी स्टाईल आहे जी कशीही घातली तरी उठून दिसते. आताच्या युगात मुलींना आणि इतर ग्राहकांना ज्या नवीन गोष्टी आहेत त्या पाहण्यात आणि तेच परिधान करण्यास आवडते. आणि तीच गोष्ट हेरून तन्वी यांनी mazikien हा ब्रँड तयार केला आहे. आताचा नवीन फॅशन ट्रेंड खूप कलरफुल झाला असून या पिढीला तेच रंगीत कपडे आणि ट्रेंडिंग फॅशन हे mazikien या ब्रँडच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करते.

या ब्रँडचे कपडे इतर ब्रँडच्या कपड्यांच्या किमतीच्या तुलनेत कमी किमतीत चांगल्या क्वालिटीचे असतात. एका नवीन स्टार्टअपमध्ये नवनवीन ग्राहक खरेदी करण्यासाठी परत परत येणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आताची पिढी वेगवेगळे फॅशन ट्रेंड्स फॉले करते. लग्नांमध्ये हल्ली थीम पार्टीचे आयोजन केले जाते. तर त्यासाठी Mazikien हा ब्रँड थीम स्टाईलचे कपडे उपलब्ध करून देतो.