ठाणेकरांनो या अकॅडमीमध्ये घ्या टेनिसचे प्रशिक्षण

टेनिस हा एक ऑलिम्पिक दर्जाचा खेळ आहे आणि समाजाच्या सर्व स्तरांवर आणि सर्व वयोगटात खेळला जातो. टेनिसच्या आधुनिक खेळाचा उगम इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात लॉन टेनिस म्हणून झाला. लॉन टेनिस हा जागतिक पातळीवरील खेळ आहे .ह्या खेळाचे अनेक फायदे आहेत. हळूहळू ठाणेकरांचा या खेळाप्रति असलेला उत्साह वाढताना दिसत आहे.

लॉन टेनिसचे फायदे :
* हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते.
•हात-डोळा यातील समन्वय वाढतो.
* सामर्थ्य आणि सहनशक्ती विकसित होते.
•मानसिक फोकस आणि एकाग्रता वाढवते.
* सामाजिक संबंधांना प्रोत्साहन देते.
* चपळता आणि गती सुधारते.
* तणाव आणि चिंता कमी करते.
* समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करते.
* आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवते.

खेळाचा इतिहास – इतिहासकारांचा असा विश्वास आहे की, टेनिसची उत्पत्ती १२ व्या शतकातील उत्तर फ्रान्समध्ये झाली, तिथे हाताच्या तळव्यावर चेंडू मारला गेला होता. फ्रान्सचा लुई एक्स हा ज्यू डी पॉम चा एक उत्कट खेळाडू होता. जो खऱ्या टेनिसमध्ये विकसित झाला आणि आधुनिक शैलीत इनडोअर टेनिस कोर्ट बांधणारा पहिला व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झाला. १६ व्या शतकापर्यंत रॅकेट वापरात आले आणि खेळाला टेनिस असे संबोधले जाऊ लागले.

लॉन टेनिस अकॅडमी

लॉन टेनिस अकॅडमी ही पंचवीस वर्ष जुनी अकॅडमी असून सध्या महाराष्ट्र स्टेट असोसिएशन आणि ठाणे जिल्हा असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिसचे प्रशिक्षण येथे दिले जाते. या अकॅडमीमध्ये अनुभवी असे दोन वरिष्ठ प्रशिक्षक असून पाच सहकारी प्रशिक्षक आहेत. सध्या 140 पेक्षा जास्त खेळाडू या अकॅडमीतून प्रशिक्षण घेत आहेत. येथे दोन वर्षाहून मोठ्या मुलांना टेनिस शिकवण्यास सुरुवात केली जाते. ज्यामुळे मुलांना या खेळाची सवय होते. त्यांच्या मनातून या खेळासाठी असलेली भीती घालवली जाते. लॉन टेनिस अकॅडमी मधील अनेक मुलं ही जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, देशस्तरीय टेनिस मॅचेसमध्ये सहभागी होत असतात.
अधिक माहितीसाठी संपर्क -8082631990

मी वयाच्या आठव्या वर्षापासून टेनिस खेळत आहे. २०१८ साली मी वर्ल्ड गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्यात मला रौप्यपदक मिळाले आहे. २०१० पासून मी टेनिसचे प्रशिक्षण देत असून आतापर्यंत जवळजवळ 22 मुलं प्रशिक्षण घेऊन नॅशनल लेवलला खेळलेली आहेत. टेनिस हा एक सर्वगुण संपन्न असा खेळ आहे. यामध्ये मुलांचा आत्मविश्वास वाढतो. आता टेनिस हा एक प्रोफेशनल खेळ असल्यामुळे 35, 45, 55 या वयोगटातील लोकांसाठी नॅशनल टेनिस फेडेरेशनतर्फे किंवा स्टेट फेडेरेशनतर्फे मोठमोठे इव्हेंट आयोजित केले जातात. त्यामुळे या खेळात प्रौढ लोकांचा सहभाग खूप जास्त दिसून येत आहे. ठाणेकरांचा या खेळाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परंतु ठाण्यात टेनिस शिकवणाऱ्या अकॅडमींची संख्या वाढली पाहिजे.
तुषार धायगुडे,
वरिष्ठ प्रशिक्षक, लॉन टेनिस अकॅडमी.

माझे वय 65 पेक्षा जास्त असून मी गेली अनेक वर्ष टेनिस या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच मला टेनिसची आवड निर्माण झाली. मला २०२२ सालच्या मास्टर्स चॅम्पियनशीप 65+ वर्गामध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सुध्दा मिळाली होती. मला टेनिस मॅचेसमध्ये अनेक मेडल्स मिळाली आहेत. टेनिस हा प्रत्येकाने खेळला पाहिजे असा खेळ आहे. टेनिस खेळायला लागल्यापासून मला माझ्यात अनेक बदल जाणवले आहेत. माझ्या एकाग्रतेमध्ये, आत्मविश्वासामध्ये कमालीची वाढ झालेली मला जाणवते.
विनायक गुजराती
खेळाडू, लॉन टेनिस अकॅडमी.

——————————————————————————-

सिग्मा टेनिस अकॅडमी

ठाण्यातील सिग्मा ही टेनिस अकॅडमी पंधरा वर्ष जुनी असून येथे जवळजवळ शंभरहून अधिक मुले टेनिसचे प्रशिक्षण घेत आहेत. वयाच्या पाच वर्षांपासून मुले येथे टेनिस शिकण्यासाठी येऊ शकतात. या अकॅडमीमध्ये अनुभवी व प्रशिक्षित असे सात प्रशिक्षक टेनिसचे प्रशिक्षण देतात. येथे केवळ मनोरंजन म्हणून खेळ खेळायचा म्हणून न येता अनेक जण टेनिस खेळातच करिअर करायचे आहे या विचाराने येतात व त्यांना त्यायोगे प्रशिक्षण दिले जाते. येथील अनेक मुले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीचे टेनिस खेळाडू आहेत. यातील चैर वारिक हा आंतरराष्ट्रीय पातळीचा खेळाडू असून ईशाल पठाण, तमन्ना नायर , दिव्यांग रसगोत्रा, प्रणव रसगोत्रा आदी अनेक राष्ट्रीय पातळीचे खेळाडू प्रशिक्षण घेतात. ठाणेकरांचा टेनिसकडे असलेला वाढता कल सोबत अकॅडमीलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या सिग्मा टेनिस अकॅडमी हिरानंदानी वन पार्क, हिरानंदानी रोडास, सिध्दाचल (वसंत विहार) येथे असून लवकरच नव्या जागेत व मोठ्या स्वरूपात अकॅडमी प्रस्थापित करण्याचा अकॅडमी धारकांचा मानस आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:8355801388

मी गेल्या अनेक वर्षांपासून टेनिस खेळत असून मी सध्या सिग्मा टेनिस अकॅडमीमध्ये टेनिस खेळाचे प्रशिक्षण देत आहे. मी एका टेनिस क्लबमध्ये बॉल बॉय म्हणून काम करत असताना मला या खेळाची आवड निर्माण झाली व मी त्या खेळाचे रीतसर प्रशिक्षण घेतले. मी आजपर्यंत जवळपास पाचशेहून अधिक मुलांना टेनिसचे प्रशिक्षण दिलेले आहे. टेनिस हा तेवढासा लोकप्रिय खेळ नसला तरी लोकांनी हा खेळ खेळला पाहिजे. हा एक उत्तम खेळ असून याचे अनेक फायदेसुध्दा आहेत. टेनिसमुळे एकाग्रता वाढते, आत्मविश्वास वाढू लागतो असे टेनिसचे अनेक फायदे आहेत.
सूरज गिरी
प्रशिक्षक,सिग्मा टेनिस अँकॅडमी.

माझं वय वर्ष पंधरा असून मी गेली साडेचार वर्ष टेनिस खेळत आहे. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझे वजन खूप जास्त होते आणि फिटनेसच्या उद्देशाने मी टेनिस खेळायला सुरुवात केली. पण नंतर मी ते माझे करिअर म्हणून निवडले आणि टेनिस स्टार बनण्याचा निर्णय घेतला. टेनिसने मला माझे मन शांत ठेवण्यास आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक कार्यात माझे लक्ष सुधारण्यास मदत केली आहे. त्यामुळे प्रत्येक कामात माझे गांभीर्य वाढले आहे. तंदुरुस्त राहण्यास मदत झाली आहे. मी सध्या राष्ट्रस्तरावर टेनिस खेळते.
श्रीमोयी कामत ,
खेळाडू ,सिग्मा टेनिस अकॅडमी

—————————————————————————-

एनी टाईम स्पोर्टस् – ठाण्यातील एनी टाईम स्पोर्टस् या दुकानात लॉन टेनिस खेळासाठी लागणारे सर्व साहित्य मिळते. यात लॉन टेनिस बॉल, लॉन टेनिस बॅट, शुज इ. चा समावेश आहे.
कुठे – मानपाडा, ठाणे
चॅम्पियन स्पोर्टस् – या दुकानात टेनिस खेळासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे. यात टेनिस बॅट, टेनिस बॉल, टेनिस नेट, सरावासाठी लागणारे संपूर्ण किट येथे मिळते.
कुठे – नौपाडा, ठाणे