राष्ट्रवादीने केली मागणी
बदलापूर: बदलापुरातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णाला धमकावणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात सोमवारी सकाळी उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका रुग्णाला येथील डॉक्टरने गप्प उभा रहा नाहीतर रुग्णालय बंद करुन टाकेन, अशी धमकी देत अपमान केल्याची संतापजनक घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांची भेट घेऊन, त्यांना कुलूप व चावी देत रुग्णालय बंद करूनच दाखवा, असे आव्हान देत खडे बोल सुनावले.