लहान मुलांसाठी समर कलेक्शन

उन्हाळ्यात उष्णतेबरोबरच काही ठिकाणी दमट तर काही ठिकाणी कोरडे हवामान असते. पूर्वी मराठवाडा विदर्भात ४०°c तापमान असायचे मात्र आता मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरातही तापमान वाढत असून अंगाची लाहीलाही होते. अशातच मऊ, लुसलुशीत, सुटसुटीत हवेशीर सुती कपडे घालण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो. तर लहान मुले, नवजात बालकांना उन्हाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी आरामदायी कपडे घालणे गरजेचे असून हे कपडे कसे आणि कुठे घ्यावेत याबाबत थोडक्यात माहिती…..

लहान बाळांना तसेच त्यापेक्षा थोड्या मोठ्या मुलांना उन्हाळ्यात उष्णता आणि आर्द्रतेचा धोका जास्त असतो. उन्हाळ्यात लहान बाळांना कसे कपडे घालावेत ते त्यांना आरामदायी ठेवण्यासाठी आणि उष्णतेशी संबंधित आजारांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहेत. बाळाचे कपडे खरेदी करताना या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

१. श्वास घेण्यायोग्य कपड्यांची निवड करा. म्हणजेच जास्त घट्ट कपडे घेऊ नका.
२. लाइटवेट (हलके) आणि लूज-फिटिंग डिझाईन्सचा विचार करा.
३. शरीरातील घाम टिपून घेतील असे फॅब्रिक वापरा.
४. वायब्रंट कलर आणि प्रिंट असलेले कपडे खरेदी करा.
५. शक्यतो जास्त वर्क, टिकल्या, मणी, टोचेल असे डिझाईन असलेले कपडे खरेदी करू नये.

तुम्हाला देखील तुमच्या मुलांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात घालण्याकरिता कपडे खरेदी करायचे असतील तर ठाण्यातील या दुकानांना नक्की भेट द्या.

राम मारुती रोड

कलर किड्स

राम मारुती रोड येथे असलेल्या कलर किड्स या दुकानात लहान मुलांकरीता जंपसूट, कॉटन नाईट ड्रेस, लहान बाळांचे टीशर्ट सेट, लहान बाळाचे गिफ्ट सेट, फॅन्सी बूट, झबले, लंगोट, फॅन्सी टोपी उपलब्ध आहेत.

किड्स पार्टी

किड्स पार्टी या दुकानात लहान मुलांचे को-ऑर्ड सेट, रेग्युलर टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, शॉर्ट्स, नाईट सूट, हाफ सूट, जंपसूट, कॉटन फ्रॉक उपलब्ध आहेत.

बबल्स (Bubbles)

राम मारुती रोड येथे असलेल्या bubbles या दुकानात लहान बाळांचे वेगवेगळे उन्हाळ्यात घालायचे कपडे आहेत. येथे मुलींकरिता सुती फ्रॉक, जंपसूट, कॉ-ऑर्ड सेट, टॉप, लेगीन्स आणि कॉटन नाईट सूट उपलब्ध आहेत. तर मुलांसाठी टी-शर्ट, कॉ-ऑर्ड सेट, हाफ स्लीव्हज प्रिंट शर्ट, शॉर्ट्स आणि प्युअर कॉटन नाईट सूट उपलब्ध आहेत.

कच्चा लिंबू

कच्चा लिंबू येथे मुलांकरिता स्लीव्हलेस टीशर्ट, हाफ टीशर्ट, कॉटन कार्गो, कॉटन पॅन्ट, कॉ-ऑर्ड सेट, बेबी सेट, नाईट सूट उपलब्ध आहेत तर मुलींकरिता टॉप, शॉर्टस्, प्लाझो, कॉ-ऑर्ड सेट, टॅन टॉप, नाईट सूट उपलब्ध आहेत.

जांभळी नाका

आई किड्स

जांभळी नाका येथे असलेल्या आई किड्स या दुकानात लहान मुलांचे विविध कपडे उपलब्ध आहेत. कॉटन फ्रॉक, टी-शर्ट, शॉर्टस्, टॉप, कॉ-ऑर्ड सेट, रेग्युलर टी-शर्ट, हाफ टी-शर्ट, स्लीव्हलेस टीशर्ट, थ्री फोर्थ उपलब्ध आहेत.

दीप ज्योती

दीप ज्योती हे दुकान ठाण्यातील जांभळी नाका येथे आहे. या दुकानात लहान बाळांकरिता स्लीव्हलेस फ्रॉक, होजेरी स्लिप फ्रॉक, कॉटन फ्रॉक, कॉ-ऑर्ड सेट, होजेरी हॉट शॉर्ट, मुलांसाठी ट्रॅक पॅन्ट, गर्ल्स ट्रॅक पॅन्ट , गर्ल्स प्रिंटेड पायजामा, शर्ट, कॅप, शॉर्ट उपलब्ध आहेत.