विद्यार्थ्यांनो आता परीक्षेची चिंता सोडा अशी करा दहावीची तयारी

दहावी बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी, ही अनेक विद्यार्थ्यांची सामान्य चिंता आहे. बोर्डाची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला हे लक्षात घ्या की, तुम्हाला जरी असे वाटत असले की ही परीक्षा खूप कठीण आहे, तरी तसे नसते. सुरुवातीपासूनच मन लावून अभ्यास करणे आवश्यक असते. परीक्षा तोंडावर आल्यावर अभ्यास करू नये. आत्मविश्वासाने आणि यशाने तुम्ही या महत्त्वाच्या टप्प्यात अभ्यासाची तयारी करा. बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया..
सुरुवातीपासून अभ्यासाला सुरुवात केली तर तुम्हाला परीक्षेची जास्त भीती वाटणार नाही. एक लक्षात घ्या की, हे वर्ष तुमच्या आयुष्यात एकदाच येणार आणि त्यात जर तुम्ही घाबरलात, तर घाबरून तुमची तयारी कमी होते. यामुळे घाबरून न जाता तुम्ही पूर्ण जोमाने अभ्यास करा. त्याचबरोबर तुमच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्या. पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे.
दहावीच्या परीक्षेची तयारी अशी करा :-
विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच दहावीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त पाठ्य पुस्तके वाचली पाहिजेत. लिखाण आणि गणिताचा सराव नियमित केला पाहिजे. तुमच्या अभ्यासाचे तास वाढवले पाहिजेत. धडे वाचून स्वतःच्या नोट्स काढल्या पाहिजेत. तुमच्या वेळापत्रकानुसार रोज अभ्यासाचा सराव करणे गरजेचे आहे. पाठांतर करताना लिहून पाठांतर करावे. भूगोल विषयात नकाशे, आलेख यांचा सराव करावा. वेळापत्रक बनवताना भाषा, विज्ञान, समाजशास्त्र आणि गणित अशा विभागात विषयांची विभागणी करून वेळापत्रक बनवावे.
पेपरमध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील काही येत नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही फक्त पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून गेलात तरी तो पुरेसा असतो. पण पाठ्यपुस्तकाचे प्रत्येक पान तुमच्या लक्षात असले पाहिजे. एखादी ओळ जी आपल्याला महत्वाची वाटत नसेल ती सुद्धा परीक्षेत येऊ शकते. त्यामुळे पाठ्यपुस्तकाचे वाचन हे अत्यंत महत्त्वाचे असते. हे लक्षात घ्या की, तुमच्या बरोबर शेकडो विद्यार्थी पेपर लिहीत असतात त्यामुळे सर्वजण टार्गेट, नवनीत अशा इतर पुस्तकातून अभ्यास करून पेपर सोडवतात. परीक्षकाला सर्व उत्तरे सारखी दिसल्यामुळे तुमचे मार्क कमी होण्याची शक्यता वाढते. स्वतःच्या नोट्स बनवणे महत्त्वाचे आहे. स्वतःच्या भाषेत योग्य उत्तरे लिहा. त्यामुळे तुमचा पेपर सगळ्यात वेगळा दिसून येतो.
परीक्षेत हे बदल झाले आहेत 
परीक्षेचा कालावधी पुन्हा पूर्ववत करण्यात आला आहे. कोरोना काळानंतर परीक्षेच्या कालावधीत वाढीव वेळ दिला जात होता. तो आता बंद झाला आहे. विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव केला पाहिजे, जेणेकरून पेपर वेळेत पूर्ण होईल.
परीक्षेची तयारी कशी करावी?
नियमित अभ्यास करा.
अभ्यास करण्यासाठी वेळापत्रक बनवा.
मन शांत करण्यासाठी लाईट म्युझिक ऐकू शकता.
नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावा.
सहसा प्रश्न योग्य क्रमानेच लिहा. प्रश्न क्रमांक लिहिताना प्रश्नपत्रिकेतील योग्य क्रमांक उत्तरपत्रिकेत लिहावा.
विज्ञान, समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नांची उत्तरे मुद्देसूद लिहावी. शाळेचे प्रकल्प वेळेत पूर्ण करून द्यावेत.
काय करु नये
परीक्षा तोंडावर आल्यावर अभ्यास करू नये.
विद्यार्थ्यांनी टीव्ही आणि मोबाईल वापरू नये.
पेपर नीटनेटका असावा, जास्त खाडाखोड करू नये.
वेळेचा अपव्यय टाळावा.
असा करा अभ्यास 
गणित –  सर्वप्रथम गणित विषयासाठी भरपूर सराव करणे आवश्यक आहे. एकाच प्रश्नाचा ५ ते ६ वेळा सराव करा. गणित विषयाचा सराव रोज करावा.
विज्ञान – या विषयात उत्तरे ही मुद्देसूद पाठ करावी. आकृत्यांचा सराव करावा. तुमच्या संकल्पना योग्य असणे गरजेचे असते. शाळेत, क्लासमध्ये शिकवण्याकडे पूर्ण लक्ष देऊन तुमच्या शंका विचारा.
सामाजिक शास्त्र – यासाठी फक्त पाठांतर केले तरी पुरेसे असते. या विषयाची उत्तरे ही मुद्देसूद असावी. या विषयात पाठयपुस्तकाच्या मागचेच प्रश्न पेपर मध्ये येतात. त्यामु‌ळे ते पक्के करावे.
भाषा – भाषेसाठी खरेतर अनेकदा मुले काहीच अभ्यास करत नाहीत आणि अनेकदा पेपर अपूर्ण राहतो. त्याचे कारण म्हणजे कमी पडलेला सराव. तुम्ही जर तो पॅसेज आधीच वाचलेला असेल तर पेपर लिहिताना तुमचा वेळ वाचतो. शिवाय तुमचा पेपर अपूर्ण राहत नाही. या विषगात व्याकरण आणि लेखन कौशल्य यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तुम्ही आठवड्यातून कमीतकमी दोन निबंध, पत्र, जाहिरात याचा सराव केला पाहिजे.
हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्कने करा
हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्कने अभ्यास करा. तुम्ही दिवसाला तुमचे अभ्यासाचे लक्ष्य ठरवा आणि जोपर्यंत ते लक्ष्य पूर्ण होत नाही, तोपर्यंत अभ्यास करा. कमी तास अभ्यास झाला तरी चालेल, परंतु त्या कमी वेळेत तुमचा भरपूर आणि पक्का अभ्यास झाला पाहिले. याने तुमचा अभ्यास शेवटपर्यंत लक्षात राहतो.
ही परीक्षा अशी असते 
परीक्षा अगदी सोपी असते. एकूण 600 गुणांची ही परीक्षा असते. परंतु ‘सर्वोत्तम पाच’ असल्यामुळे तुमचे टॉप 5 विषयाचे गुण ग्राह्य धरले जातात. लेखी पेपर एवढेच प्रॅक्टिकल सुद्धा महत्त्वाचे असते. प्रत्येक विषयाचे २० गुण शाळेकडून दिले जातात. त्यामुळे प्रकल्प आणि तोंडी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात आणि ८० गुणाचे लेखी पेपर असतात.
ठाण्यातील दहावी शालान्त अभ्यासक्रम शिकवणारे क्लासेस 
१) एलिट क्लासेस
या क्लासेसची स्थापना १९९६ साली झाली. येथे व्हेकेशन बॅच चालू होते. ऑक्टोबरपर्यंत या बॅचचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होतो. त्यानंतर फक्त ते सरावावर लक्ष केंद्रीत करतात. वैशाली मोहिते, अंजली महाडिक या शिक्षकांची अनुभवी आणि कठोर परिश्रम करणारी टीम ज्यांनी वर्षानुवर्षे त्यांच्या विषयात प्रभुत्व मिळवले आहे. जे विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा शोध घेण्यास आणि कठीण संकल्पना शक्य तितक्या सोप्या बनवण्यात मदत करतात. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विस्तृत आणि पद्धतशीर अभ्यास साहित्य प्रदान करतात. या क्लासेसचा निकाल गेल्या २८ वर्षापासून १०० टक्के लागत आहे. २०२३ मध्ये बेस्ट कोचिंग क्लासेस ऑफ ठाणे हे पारितोषिक एलिट क्लासेसला मिळाले. यंदा दुर्वांग गुप्ता याने ९५.२० टक्के मिळवून ठाण्यातील प्रसिद्ध सेंट जॉन द बॅप्टिस्ट स्कूलमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. येथे एका बॅचमध्ये २५ विद्यार्थीच असतात त्यामुळे विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले जाते.
प्रतिक्रिया
२) वाकणकर ग्रुप ट्यूशन्स
वाकणकर ग्रुप ट्यूशन्स ठाण्यात अनेक दशकांपासून CBSE बोर्ड, ICSE बोर्ड आणि राज्य मंडळाच्या 10वी वर्गासाठी क्लासेस घेतात. ठाणे, मुलुंड, कळवा, भांडुप, डोंबिवली आणि ऐरोली अशा त्यांच्या एकूण १४ शाखा आहेत. ठाण्यात वाकणकर ग्रुप ट्यूशन्सचे २००२ साली क्लासेस सुरू झाले. येथे एसी क्लासरूम, स्मार्ट बोर्ड आहेत. सर्वात महत्त्वाचे मुलांना वेळेवर चुका दाखवल्या जातात आणि परीक्षेच्या आधी दुरुस्त करुन घेतल्या जातात. हेच यशाचे गमक आहे. येथे खूप अनुभवी शिक्षक मार्गदर्शन करतात.