केंद्र-राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादीची जोरदार निदर्शने

ठाणे : देशात सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तरूण बेरोजगार आहेत तर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यावर तोडगा काढण्याऐवजी सरकार भावनिक खेळ खेळत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. एखाद्या राज्यात निवडणुका आल्यास इंधनाच्या दरात दोन रूपये कपात करून नंतर पाच रूपये वाढविले जात आहेत. दोन कोटी रोजगाराचे आश्वासन देऊनही तरूणांच्या हाताला रोजगार देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढीस लागले आहेत. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी गुरूवारी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार, महिलाध्यक्षा सुजाता घाग, महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली. तसेच विविध समस्या आणि आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

या आंदोलनात विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, राहू पाटील, ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी, दिगंबर लवटे, सामाजिक न्याय विभागाचे बाळेस हत्तीअंबीरे, ज्येष्ठ नागरिक सेलचे दिलीप नाईक, हाॅकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षेत्रीय, असंघटीत कामगार सेलचे अध्यक्ष राजू चापले, प्रदेश सरचिटणीस कैलास हावळे, बागेश गंगा सोनी, एकनाथ जाधव, संतोष भोईर, शिवा कालुसिंग, रचना वैद्य, संदीप यादव, महेद्र पवार, विक्रांत घाग, संतोष मोरे, विलास पाटील, विशाल खामकर, रत्नेश दुबे, संतोष साटम, आदी सहभागी झाले होते.