पावसातही राहा कोरडे !

बाजारात फॅशनेबल-टिकाऊ छत्री रेनकोटचा मोसम 

पावसाळा सुरु झाला की नागरिकांची बाजारात खरेदीसाठी लगबग सुरु होते. छत्री, रेनकोट खरेदी करण्यासाठी लोक दुकानांमध्ये गर्दी करतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगेबिरंगी छत्री आणि रेनकोट उपलब्ध होत आहेत. ठाणे शहरात देखील पावसाची सुरुवात झाली असून ठाण्यातील बाजारपेठा ह्या छत्री आणि रेनकोटने सजलेल्या दिसत आहेत. तुम्हाला देखील ठाण्यात रेनकोट किंवा छत्रीची खरेदी करायची असेल तर ठाण्यातील ह्या दुकानांना एकदा तरी नक्की भेट द्या.

 

 

लक्ष्मी गारमेंट

ठाणे स्टेशन परिसरातील लक्ष्मी गारमेंट येथे पावसाळी छत्र्या व रेनकोट मिळतात. येथे विशेषतः रेनकोटमध्ये अनेक प्रकारची व्हरायटी उपलब्ध आहे. रेनकोटमध्ये वन पीस रेनकोट, स्कुटी रेनकोट, पॅन्ट व जॅकेट रेनकोट उपलब्ध आहेत. जर तुम्हाला फक्त पॅन्ट किंवा फक्त जॅकेट हवे असेल तर ते देखील येथे मिळतात. विविध रंगाचे व डिझाईनचे रेनकोट येथे उपलब्ध आहेत. ह्या रेनकोट्सच्या किमती ५००/- रुपयांपासून सुरु होतात. त्याच सोबत येथे छत्र्यांमध्येही विविध प्रकार ठाणेकरांना पाहायला मिळतील. साधी छत्री येथे १५० रु. पासून सूरू होते, तर सध्या ट्रेंडिंग आणि चर्चेत असलेली ऑटोमॅटिक कलर चेंगिन्ग छत्री म्हणजे मॅजिक अम्ब्रेला देखील येथे मिळते. ३०० रुपयांपासून ह्या छत्र्यांची किंमत आहे. त्याच सोबत ऑटोमॅटिक उघडबंद होणाऱ्या छत्र्या ४५० रुपयांपासून येथे मिळतात. बच्चेकंपनीसाठी कार्टून्स असलेल्या छत्र्या १५० रुपयांपासून मिळतात.

पत्ता : स्टेशन रोड, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या समोर, ठाणे

संपर्क : ९९३०९२२४४५
———–

उषा सारी अँड मॅचिंग सेंटर

ठाण्यातील गावदेवी परिसरात असलेले उषा सारी अँड मॅचिंग सेंटर ह्या दुकानात विविध प्रकारच्या छत्र्या उपलब्ध असून हे दुकान वेगवेगळ्या आणि ट्रेंडिंग छत्र्यांसाठी ठाण्यात प्रसिद्ध आहे. येथे छत्र्यांमध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतील. यात फॅन्सी छत्र्या, मॅजिक छत्र्या (पाणी पडल्यावर रंग बदलणाऱ्या), प्लास्टिक कोटेड छत्र्या, लॉन्ग फॅन्सी छत्र्या, जंबो छत्र्या, रेग्युलर छत्र्या, लॉन्ग छत्र्या, त्याचसोबत लहान मुलांसाठी देखील विविध रंगाचे व विशेष कार्टून प्रिंट असलेल्या छत्र्या आणि कानाचा आकार असलेल्या छत्र्या देखील येथे उपलब्ध आहेत. ह्या छत्र्यांची किंमत २०० रुपयांपासून सुरु होते.

पत्ता : स्टेशन रोड, गावदेवी मंदिरच्या बाजूला, ठाणे

———-

जय कलेक्शन

उथळसर येथे असलेल्या जय कलेक्शन मध्ये पावसाळी रेनकोट, छत्र्यांचे नवनवीन प्रकार उपलब्ध आहेत. यात फॅन्सी छत्र्या, लहान मुलांच्या आवडीची कार्टून्स असलेल्या छत्र्या , मॅजिक छत्र्या, जंबो साईझ छत्र्या त्याचसोबत थ्रीफोल्ड छत्री, रेग्युलर साईझ छत्री येथे ठाणेकरांना मिळतील. त्याचसोबत डबल कोटिंग छत्र्या आणि फ्रिल असलेल्या छत्र्या देखील उपलब्ध आहेत. येथील छत्र्यांच्या किमतीही १५०/- रुपयांपासून सुरु आहे. त्याचसोबत रेनकोट सारखे असणारे पॉन्चो येथे १५०/- रुपयांपासून मिळायला सुरुवात होते.

पत्ता : उथळसर रोड , ठाणे

संपर्क : 98677 97110

—————–

वाइल्ड क्राफ्ट

ठाण्यातील प्रसिद्ध विवियाना मॉल येथील वाइल्ड क्राफ्ट हे दुकान रेनकोट साठी सुप्रसिद्ध दुकान आहे. येथे फक्त पुरुषांसाठीचे रेनकोट्स मिळतात. यात प्रामुख्याने रेनकोट, रेन जॅकेट, रेन सूट, रेन पॉन्चो हे प्रकार मिळतात. जर तुम्हाला नुसते जॅकेट घ्यायचे असेल किंवा नुसती पॅन्ट घ्यायची असेल तर ते देखील येथे उपलब्ध आहेत. येथे रेनकोटची किंमत ही 1800/- रुपयांपासून सुरु आहे. येथील रेनकोट्सना जास्त मागणी आहे.
येथे नुसते पुरुषांकारिता रेनकोट्स व जॅकेट्स उपलब्ध असून पुरुषांची येथे गर्दी असते.

पत्ता : विवियाना  मॉल , ठाणे

संपर्क : +91 22 6170 1384