ठाण्यात मिळतोय स्केटिंगला उत्तम प्रतिसाद

जगात विविध प्रकारचे खेळ आहेत, त्यापैकी बरेच खेळ लोकांना खेळायला आवडतात. सर्वांनाच क्रिकेट, फुटबॉल, हॉकी सारखे अनेक खेळ परिचयाचे आहेतच कदाचित काही खेळ खेळलेही असतील. यापैकीच महत्वाचा खेळ म्हणजे स्केटिंग ! हल्लीच्या काळातील हा लोकपरिचित खेळ आहे. हा खेळ सर्व वयोगटातील मुले खेळतात. या खेळातील स्पर्धाही आता वाढल्या आहेत.

खेळाचा थोडक्यात इतिहास : चौदाव्या-पंधराव्या शतकात स्केटिंग हा एक खेळ म्हणून लोकप्रिय झाला. विसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वात भारतासह अनेक देशात हा खेळ प्रसिद्ध झाला. तथापि युरोप-अमेरिकेत तो अधिक लोकप्रिय आहे. भारतात स्केटिंगची अधिकृत सुरुवात कलकत्त्यात (कोलकाता) १९५५ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग असोसिएशनद्वारे झाली. ही संघटना आंतरराष्ट्रीय स्केटिंग संघटनेला संलग्न आहे.

स्केटिंग का करावे?

1. मुलांसाठी स्केटिंग हा त्यांना सक्रिय करण्याचा उत्तम मार्ग आहे.
2. स्केटिंगमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
3. मुलांच्या शरीरातील सर्व स्नायू बळकट होतात, शक्ती वाढते.
4. मुलांना स्केटिंग निरोगी राहण्यास मदत करते. धावण्यापेक्षा स्केटिंग केल्यास शरीरातील हाडातील जाईंट्स वरील ताण कमी होतो.

ठाणे जिल्ह्यात स्केटिंग या क्रीडा प्रकाराला सध्या उत्तम प्रतिसाद मिळत असलेला पहायला मिळत आहे. अनेक शाळांमधून त्याचप्रमाणे विविध अकॅडमीमध्ये स्केटिंग शिकवले जाते. स्केटिंगमुळे होणारे फायदे लक्षात घेऊन अनेक पालक आपल्या पाल्यासाठी स्केटिंग खेळाचा विचार करताना दिसत आहेत. स्केटिंग हा क्रीडा प्रकार सामर्थ्य, संतुलन आणि समन्वय तयार करते आणि व्यायामाचा एक उत्तम स्रोत देखील प्रदान करते. स्केटिंग हा व्यायाम, कॅलरी बर्न आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी देखील एक उत्तम स्रोत आहे. स्केटिंगमुळे स्नायुंची ताकद आणि लवचिकता वाढण्यासही मदत होऊ शकते.

स्केटिंगचे प्रकार : रिंग, स्पीड, आर्टिस्टिक, फिगर स्केटिंग असे प्रकार या खेळात आहेत. रोलर स्केटिंगमध्ये आइस स्केटिंग, आइस हॉकी, आइस फिंगर, आइस स्किलिंग, आइस स्केट बोर्ड, रोलर हॉकी, रोलर स्केटिंग, रिंग स्केट, इन लाइन स्केटिंग, इन लाइन हॉकी असे प्रकार समाविष्ट आहेत. आर्टिस्टिक म्हणजे संगीताच्या तालबद्ध ठेक्यावर उड्या मारणे, उलट-सुलट फिरकी घेणे. फिगर स्केटिंग म्हणजे संगीताच्या तालावर जोडीने जिम्नॅस्टिकची कौशल्ये दाखवणारा चित्तथरारक प्रकार आहे.

स्केटिंगचे फायदे:

* स्केटिंग शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.
* वजन कमी करायचे असेल तर व्यायाम म्हणून स्केटिंग करू शकता. यामुळे शरीरात साठलेली चरबी सहज वितळते.
* स्केटिंगमुळे स्नायू मजबूत होतात.
* स्केटिंगमुळे शारीरिक ताकद आणि तग धरण्याची क्षमता देखील वाढते. यामुळे दिवसभर शरीर उत्साही राहते.
* असे केल्याने पाठ आणि कंबरेभोवतीचे दुखणे कमी होते आणि शरीरातील जडपणाही कमी होतो.
* हा व्यायाम केल्याने शरीरात लवचिकताही वाढते.

स्केटिंग करताना ही खबरदारी घ्यावी:
* स्केटिंग करताना सुरक्षित ठिकाणी स्केटिंग करत असल्याची आणि आपल्या सभोवतालची जाणीव ठेवा.
* स्केटिंगसाठी खूप व्यस्त जागा निवडू नका. गर्दीत स्केटिंग केल्याने अनेकदा दुखापतीचा धोका वाढतो.
* स्केटिंग करण्यापूर्वी वॉर्मअप करा. यामुळे दुखापतीचा धोका किंचित कमी होतो.
* योग्य आणि सुरक्षित रोलर स्केटचा वापर करा.

युनिव्हर्सल स्केटिंग अकॅडमी ठाण्यातील प्रसिध्द स्केटिंग अकॅडमीपैकी एक आहे. साधारण २००८ सालापासून स्केटिंग कोच संकेत काशिकर या अकॅडमीमध्ये स्केटिंग शिकवत आहेत. ठाण्यातील सुमारे 500 मुले वर्षभरात ह्या अकॅडमीमधून स्केटिंग शिकतात. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय अनेक स्केटिंगच्या रेसेस, स्पर्धांमध्ये सहभागी होत असून अनेकांनी यात पारितोषिके पटकावली आहेत. नुकत्याच झालेल्या ‘इन्ड्युअरन्स् नॅशनल लेव्हल रेस 2023’ मध्ये या अकॅडमी मधील १६ वर्षीय निहारिका मेनन हिने सुवर्णपदक पटकावले असून तिची निवड आंतरराष्ट्रीय स्तरासाठी झालेली आहे. त्याचप्रमाणे अक्षय, आयुष, महंत, रुनविका कोळी, इवा, प्रथमेश कार्थिक, आयु महाले यांनीही रौप्य व कांस्यपदके पटकावली आहेत. त्यांचीही निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे.

Quotes:-
१) स्केटिंग हा माझ्यासाठी उत्साहवर्धक व नवीन क्रीडाप्रकार असून गेल्या ८ वर्षांपासून मी स्केटिंग करत आहे. मला आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. अमृतसर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील रेसमुळे बऱ्याच गोष्टी मला शिकता आल्या, अनुभवता आल्या. (निहारिका मेनन, सुवर्णपदक विजेती)

२) ठाण्यात स्केटिंगला उत्तम प्रतिसाद मिळत असून पालक व शाळाही मुलांना स्केटिंग शिकण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. स्केटिंगचे अनेक फायदे आहेत. प्रत्येकाने शिकावा असा हा खेळ आहे. (संकेत काशिकर, प्रशिक्षक ( युनिव्हर्सल स्केटिंग अकॅडमी))