ठाणे: सरस्वती सेकंडरी मराठी शाळेचा माजी विद्यार्थी श्रेयस कुलकर्णी हा सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी कंपनी टेस्ला इथे कार्यरत आहे. आधी टेस्लाच्या सायबर ट्रक बनवण्याचा समूहात काम करणारा हा तरुण सध्या सर्व विश्वाचे लक्ष असणाऱ्या रोबो टॅक्सी या प्रोडक्टवर तो काम करीत आहे.
या तरुण ठाणेकराने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेत दाखल झाला, त्यातही त्याला उत्तम यश मिळाले. काही काळ वेगवेगळ्या कंपन्यांसाठी त्यांनी अमेरिकेत काम केले मात्र टेस्लामध्ये काम करण्याची तीव्र इच्छा त्याची इच्छा होती. मध्यमवयीन कुटुंबातून येणाऱ्या श्रेयसने कायम मोठी स्वप्ने पाहिली आणि प्रचंड मेहनत केली. या कष्टाच्या जोरावर त्याला हे यश संपादित करता आले. यात त्याच्या आईबाबांचा मोलाचा सहभाग आहे असे तो प्रांजळपणे कबूल करतो.
टेस्ला कंपनीचे आकर्षण आजच्या युगातील प्रत्येक तरुणाला आहे. श्रेयसलाही होते. त्याने इथे संधी प्राप्त करण्यासाठी जवळजवळ ३५० ईमेल प्रशासनाला पाठवले आणि त्याला ही संधी प्राप्त झाली. प्रत्येक तरुणाने मोठी स्वप्ने पाहावीत आणि त्याकडे वेळेत जोमाने वाटचाल सुरू करावी, असे श्रेयस सांगतो.