महिला गटात शिवतेज तर पुरुष गटात विठ्ठल क्रीडा मंडळ अव्वल

दशरथदादा पाटील कबड्डी स्पर्धेला उदंड प्रतिसाद

ठाणे: दशरथदादा पाटील चषक २०२४ कबड्डी स्पर्धेत महिला गटामध्ये शिवतेज क्रिडा मंडळाला तर पुरुष गटात विठ्ठल क्रीडा मंडळाला २१ हजार रुपये रोखीचे प्रथम पारितोषिक आणि आकर्षक चषक प्रदान करण्यात आला.

केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील याच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले, अशी माहिती दशरथदादा पाटील चषक २०२४ या कबड्डी स्पर्धेचे आयोजक, जय भारत स्पोर्ट्स क्लबचे सल्लागार, माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली.

स्पर्धेत द्वितीय पारितोषिक होतकरु मित्र मंडळ, ठाणे या महिला संघाने पटकावले. होतकरु मित्र मंडळ या महिला संघाला १४ हजारांचे दुसरे पारितोषिक व आकर्षक चषक असे बक्षीस मिळाले. तर पुरुष संघानेमध्ये रापा नाईक, वाशी या संघाला १४ हजारांचे द्वितीय पारितोषिक व आकर्षक चषक असे बक्षीस मिळाले. तृतीय पारितोषिक महिला संघ ओम वर्तकनगर, ठाणे, रोख रक्कम रुपये सात हजार व आकर्षक चषक, चतुर्थ पारितोषिक रा.फ नाईक, नवीमुंबई, या संघाला रोख रक्कम रुपये सात हजार व आकर्षक चषक देण्यात आला. विजेत्यां सर्व संघांना आकर्षक चषक माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्याकडून तर रोख रक्कम जगदीश जयराम पाटील यांच्याकडून देण्यात आली. उत्कृष्ट खेळाडू पूजा जाधव (ओम वर्तकनगर), उत्कृष्ट चढाईपटू प्राजक्ता पुजारी (होतकरु), उत्कृष्ट बचावपटू तेजश्री सुंभे (शिवतेज), स्पर्धेतील मालिकावीर माधूरी गवंडी (शिवतेज) आदी बक्षीसे रविंद्र काशिनाथ पाटील यांच्याकडून देण्यात आली. या सर्व विजेत्यांना बक्षीसाचे वितरण केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कबड्डी स्पर्धेत १४ मुलांचे व १३ मुलींचे असे २७ संघ सहभागी झाले होते, अशी माहीती दशरथदादा पाटील चषक २०२४ या कबड्डी स्पर्धेचे आयोजक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली.

याप्रसंगी शिवसेना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, पत्रकार शशिकांत कोठेकर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, आनंद परांजपे, पनवेल मनपा विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जीपी पारसिक बॅंकचे अध्यक्ष विक्रम पाटील, जीपी पारसिक बॅंकचे संचालक रणजित पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर, मिलिंद पाटील, नारायण पवार, मनोहर डुंबरे, गणेश कांबळे, सिद्धार्थ ओवळेकर, सुधीर कोकाटे, प्रियांका पाटील, नम्रता कोळी, कळंबे, मालती पाटील, शिवसेनेचे हेमंत पवार, जय भारत स्पोर्ट्स क्लबचे सल्लागार व माजी नगरसेवक उमेश पाटील, राकेश पाटील, गजानन पवार, अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष सिकंदर केणी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार कुणाल म्हात्रे, सदस्य मोरेश्वर पवार, कमलाकर पाटील, प्रशांत पाटील, विशाल खराटे, प्रकाश पाटील, प्रेमनाथ पाटील, रचना पाटील, जय पाटील आदी उपस्थित होते.