प्राथमिक शिक्षण विभागाचे स्थलांतर वागळे इस्टेट येथील कार्यालयात

स्वच्छ भारत मिशन व कृषी विभाग बी. जे. हायस्कूल येथे स्थलांतरीत

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे ग्रामीण भागातील शासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असते. जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आणि शिक्षण विभागाचे कामकाज विस्तृत असल्याने योग्य तो समन्वय ठेवण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग वागळे इस्टेट येथे भाडेतत्त्वावर घेतलेल्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आला आहे. तर कृषी विभाग आणि स्वच्छ भारत मिशन विभाग बी. जे. हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

३० डिसेंबर २०२४ रोजी प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज स्क्वेअर फिट होम्स, एस.जी. बर्वे रोड, जि. एस. टी. भवन समोर, वागळे इस्टेट, एम.आय.डी.सी, २२ नंबर सर्कल, ठाणे (प) येथील भाडेत्तत्वावर घेतलेल्या इमारतीत तर स्वच्छ भारत मिशन आणि कृषी विभाग बी. जे. हायस्कूल टेंबीनाका, वाडीया रुग्णालय जवळ, ठाणे (प) येथे स्थलांतरित करण्यात आले असल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्व संबंधित यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे.