ठाण्यात मल:निसारण प्रक्रिया प्रकल्प कार्यरत, जल प्रदूषण कायम

ठाणे : ठाणेकरांकडून दररोज मोठ्या प्रमाणावर सांडपाणी निर्माण होत असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेने मल:निसारण प्रक्रिया प्रकल्प सुरु आहेत. हरित लवादाने १००हून अधिक कोटींचा दंड सुनावल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

ठाणे महापालिकेच्या एसटीपींची दैनंदिन क्षमता एकूण 314 एमएलडी असून मासिक क्षमता 8505 एमएलडी इतकी आहे. ठाणेकरांकडून दररोज मोठ्या प्रमाणावर सांडपाणी निर्माण होते. मात्र हे सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना तसेच समुद्र आणि नाले-गटारांमध्ये वाहून गेले तर सागरी प्रदूषणात आणखीनच वाढ होण्याची भीती होईल म्हणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी ठाणे महापालिकेने सांडपाणी पुर्नप्रक्रिया प्रकल्प हाती घेतलेले आहेत.

विटावा, कोलशेत, मुंब्रा, खारीगाव, कोपरी, माजिवडे आणि पातलीपाडा या ठिकाणी वेगवेगळ्या क्षमतेचे ‘एसटीपी’ सांडपाणी प्रक्रिया संयंत्र उपलब्ध केले आहेत. ‘विटावा एसटीबी’ची दैनंदिन क्षमता मासिक 279 आहे. कोलशेत एसटीपीची दैनंदिन क्षमता 24 एमएलडी आहे आणि मासिक क्षमता 744 इतकी आहे. मुंब्रा एसटीपीची क्षमता 32 एमएलडी असून मासिक क्षमता 992 एमएलडी इतकी आहे. खारीगाव एसटीपीची दैनंदिन क्षमता 47 एमएलडी असून मासिक क्षमता 1457 एमएलडी आहे. कोपरी एसटीपीची दैनंदिन क्षमता 120 एमएलडी असून, तब्बल 3720 एमएलडी मासिक क्षमता एमएलडी आहे. माजिवडे एसटीपीची दैनंदिन क्षमता 23 एमएलडी असून,मासिक क्षमता एमएलडी 713 एमएलडी इतकी आहे आणि पातलीपाडा ‘एसटीपी’ची दैनंदिन क्षमता 59 एमएलडी दैनंदिन क्षमता असून मासिक क्षमता 600 इतकी आहे.