ठाणेकरांसाठी सीफूडची पर्वणी 

पावसाळा सुरु होताच खवय्यांना पावसाळी मासे खायचे वेध लागतात . यात कोळंबी, पापलेट, सुरमई, खेकडे आदींचा समावेश होतो. मांसाहारी खवय्यांना सीफूड विशेष आवडते. ठाण्यात सीफूडला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. ठाण्यात सीफूडसाठी अनेक प्रसिद्ध रेस्टोरंट्स आहेत. येथे नेहमीच सीफूडची चव चाखण्यासाठी गर्दी पाहायला मिळते. तुम्हाला देखील ठाण्यात सीफूडचा अनुभव घ्यायचा असेल तर या रेस्टॉरंट्सना नक्की भेट द्या. 

आम्ही कोळी सीफुड रेस्टॉरंट 

ठाण्यातील आम्ही कोळी या सीफुड रेस्टॉरंटमध्ये पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोळंबी फ्राय, बोंबील फ्राय, मांदेली फ्राय, बांगडा फ्राय, जवळा फ्राय, जवळा वडी हे सर्व पदार्थ फ्रायमध्ये उपलब्ध आहेत तर पापलेट थाळी, सुरमई थाळी, चिंबोरी थाळी, कोळंबी थाळी, शिंपल्या थाळी, बोंबील थाळी हे पदार्थ थाळीमध्ये उपलब्ध आहेत. फिश करीमध्ये पापलेट करी, सुरमई करी, कोळंबी करी आणि बांगडा करी उपलब्ध आहेत. आम्ही कोळी येथे ताज्या माशांचे पदार्थ ठाणेकरांना चाखायला मिळतील. आम्ही कोळी हे एक कोळी रेस्टॉरंट असल्यामुळे येथे कोळी मसाल्यांचा वापर करून जेवण बनवले जाते. येथील सुरमई, पापलेट आणि कोळंबीला जास्त मागणी असून ठाणेकरांची व खवय्यांची येथे खूप गर्दी होताना दिसून येते.

पत्ता : स्टेशन रोड, ठाणे पूर्व

संपर्क : ९०४४४४८७६८

——————-

मालवण तडका 

ठाण्यातील लुईसवाडी येथे असलेले मालवणी तडका हे सीफुडसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे ठाणेकरांना सीफूडमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळतील. मालवण तडका येथे स्टार्टर्स मध्ये पापलेट, कोळंबी, सुरमई, रावस, बांगडा, बोंबील, लॉबस्टर या पदार्थांचा आस्वाद घेता येऊ शकतो, सोबतच मेनकोर्स मध्ये देखील यांचा आस्वाद घेता येऊ शकतो. मालवण तडका येथे ताज्या माशांचे वेगवेगळे पदार्थ हे मालवणी मसाल्यांचा वापर करून बनवले जातात. जेव्हा एखादी नवीन व्यक्ती येथे सीफुड खाण्यास येते तेव्हा येथील कर्मचारी वर्ग हा बोंबील, पापलेट, किंवा सुरमईचा आस्वाद घेण्यास सुचवतात. त्याचबरोबर मालवण तडका येथील सीफुड तवा, मालवणी कोंबडी वडे आणि डीप फ्राय या पदार्थांना खवय्यांची पसंती असून ठाणेकर नागरिकांचे हे आवडीचे ठिकाण आहे.

पत्ता : लुईसवाडी, ठाणे

संपर्क : ७७११८७७११८

————

गारवा गार्डन रेस्ट्रो अँड बार 

गारवा गार्डन रेस्ट्रो अँड बार हे येऊर येथील प्रसिद्ध सी फूड रेस्टॉरंट आहे. येथे ठाणेकरांना सीफुडमध्ये बोंबील, पापलेट, कोळंबी, बांगडा, सुरमई इ . अनेक प्रकारचे सीफूड उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणजे येथे मिळणाऱ्या सर्व डिशेस ह्या ताज्या माशांपासून बनवल्या जातात. कोणत्याही प्रकारच्या फ्रोझन फूडचा वापर येथे जेवण बनवताना होत नाही. येथे बनवले जाणारे सर्व पदार्थ नॉनव्हेज जेवणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आगरी व मालवणी मसाल्यात तयार केले जाते. येथे सीफूड स्पेशल अशा अंदाजे वीस डिशेस उपलब्ध आहेत. येथे मिळणाऱ्या पापलेट, बोंबील व कोळंबीच्या डिशेसना ठाणेकर विशेष पसंती देताना दिसतात. येथील स्टफ पापलेट, कोळंबी, रवा तवा फ्राय हे पदार्थ विशेषतः प्रसिद्ध आहेत.

पत्ता : येऊर हिल्स , ठाणे

संपर्क : ९९३०६५०५५५

——————

फक्त मालवणी

फक्त मालवणी हे ठाण्यातील सीफूडसाठी प्रसिद्ध असलेलं रेस्टॉरंट आहे. येथे फिश रवा फ्राय, फिश सूप, फिश थाळी, फिश करी, फिश तिखलं, फिश राईस इ. सीफुड डिशेसचा समावेश आहे. येथील मेन कोर्स मालवणी डिशेस असल्याने येथे घरातील अस्सल मालवणी मसाल्याचा वापर केला जातो. मासेमारी बंद झाल्यावर फक्त 15-20 दिवस येथे फ्रोझन मासे वापरले जातात, कारण बाजारात कुठेच मासे ताजे मिळत नाहीत ही कल्पना ग्राहकांना आधीच दिली जाते. येथे सीफूडमध्ये 8-10 वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. परंतु जास्त मागणी सुरमई, पापलेट, कोळंबीला आहे. भरलेले बोंबील, भरलेले पापलेट आणि सर्व प्रकारच्या थाळींना येथे विशेष मागणी आहे. ठाणेकरांचा ह्या रेस्टॉरंटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पत्ता : पाचपाखाडी, ठाणे

संपर्क : ९००४०६६८८४