स्कॉटलंड-बांगलादेश करणार आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाची सुरुवात

आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या नवव्या आवृत्तीची जंगी सुरुवात ३ ऑक्टोबरपासून यूएई मध्ये होणार आहे. पहिला सामना शारजाहमध्ये खेळवला जाईल ज्यात टी-२० विश्वचषकात पदार्पण करणारा स्कॉटलंड, बांगलादेशला सामोरे जाईल.

 

आमने-सामने

स्कॉटलंड आणि बांगलादेश यांनी एकमेकांविरुद्ध चार आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. ते सर्व सामने बांगलादेशने जिंकले आहेत.

 

संघ

बांगलादेश: निगर सुलताना जोती (कर्णधार), नाहिदा अक्तर, मुर्शिदा खातून, शोर्ना अक्तर, रितू मोनी, शोभना मोस्तरी, राबेया खान, सुलताना खातून, फहिमा खातून, मारुफा अक्तर, जहानारा आलम, दिलारा अक्तर, ताज नेहार, शठी राणी, दिशा बिस्वास

स्कॉटलंड: कॅथरीन ब्राइस (कर्णधार), सारा ब्राइस, लोर्ना जॅक-ब्राउन, अब्बी एटकेन-ड्रमंड, अबताहा मकसूद, सास्किया हॉर्ले, क्लोई एबेल, प्रियनाझ चॅटर्जी, मेगन मॅकॉल, डार्सी कार्टर, आयल्सा लिस्टर, हॅना रेनी, रेचेल स्लेटर, कॅथरीन फ्रेझर, ऑलिव्हिया बेल

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवावे

कॅथरीन ब्राइस: स्कॉटलंडच्या कर्णधाराने या कॅलेंडर वर्षात पाच पाच आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये १७७ धावा केल्या आहेत. या उजव्या हाताच्या टॉप ऑर्डर फलंदाजाने ११२च्या दमदार स्ट्राइक रेटने आणि ८९च्या अविश्वसनीय सरासरीने धावा केल्या आहेत. तिच्या संघासाठी तिने या वर्षी सर्वाधिक धावा रचल्या आहेत. एक शानदार फलंदाज असण्याव्यतिरिक्त ती एक उत्कृष्ट उजव्या हाताची वेगवान गोलंदाजसुद्धा आहे.

रॅचेल स्लेटर: स्कॉटलंडची ही डावखुरी मध्यमगती गोलंदाज या कॅलेंडर वर्षात चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तिने सहा आंतराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये ११ बळी घेतले, जे तिच्या संघासाठी सर्वाधिक आहे. ती नवीन चेंडूने गोलंदाजी करते आणि पॉवरप्लेमध्ये विकेट्स पटकावण्याची क्षमता ठेवते.

निगर सुलताना जोती: बांगलादेशची कर्णधार ही संघाच्या फलंदाजीचा कणा आहे. या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने बांगलादेशसाठी या कॅलेंडर वर्षात आंतराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तिने १२ सामन्यात ३३१ धावा केल्या आहेत ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

राबेया खान: ही बांगलादेशी लेग स्पिनर या कॅलेंडर वर्षात तिच्या देशासाठी आंतराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. तिने ११ डावात अवघ्या १४ विकेट्स घेतल्या आहेत.

 

ग्राउंडची आकडेवारी

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या आधी, २०१५ आणि २०१७ दरम्यान शारजाह क्रिकेट स्टेडियमवर १० महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. प्रथम आणि द्वितीय फलंदाजी करणाऱ्या संघांनी समान संख्येने सामने जिंकले आहेत. पहिल्या डावात सर्वाधिक विजयी धावसंख्या १५१ आहे.

 

हवामान

भरपूर सूर्यप्रकाश असणारा आणि उबदार हवामान असेल अशी अपेक्षा आहे. तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ३ ऑक्टोबर २०२४

वेळ: दुपारी ३:३० वाजता

स्थळ: शारजाह क्रिकेट स्टेडियम

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार