कोडीयनयुक्त कफ सिरपच्या ४६७ बाटल्यांची विक्री

* तीन आरोपींना अटक
* ६७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ठाणे : कोडीयनयुक्त कफ सिरपच्या ४६७ बाटल्यांची विक्री करणा-या तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ६७ लाख १२,३७७ मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अंमली पदार्थ विक्री करणा-या व्यक्तींच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याची कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी कारवाई केली आहे.

१२ जानेवारी २०२५ रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करुन त्याच दिवशी रात्री ९ जानेवारी २५ रोजी ठाणे शिळ-डायघर देसाई नाका रिव्हरवुड पार्कसमोर जॉन जेम्स फ्रांसिस उर्फ ओनाह एथलबर्ट जॉन फ्रान्सिस (४५) नायजेरीयन नागरिकाकडे ६६ लाख १८ हजार किंमतीचा अंमली पदार्थ आढळून आला आहे. १७ जानेवारीपर्यंत आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे.

आरोपीने बांद्रा अंमली पदार्थ विरोधी येथे एनडीपीएस अ‍ॅक्टमध्ये सजा भोगली असून, सह-परकीय परकीय नागरीक कायद्यानुसार आणि या गुन्ह्यातही सहा वर्षे शिक्षा भोगून १३ नोव्हेंबर २०२४ रोजी कारागृहातून बाहेर आला आहे. ९ जानेवारी २५ रोजी रात्री साडे आठ वाजता भिवंडी कोनगाव येथे नौशाद अन्सार अहमद शेख (४५) आणि मोहमद तौकिर फारुख अन्सारी (२४/नागाव भिवंडी) यांनी आपापसात संगनमत केले आणि आपल्या ताब्यात कोडीनयुक्त कफसिरपच्या १८८ बॉटल्स बेकायदेशीरपणे कब्जात बाळगल्या आढळल्या. या बॉटल्स एकूण ४६७ बॉटल्स आहेत.