साकेत, खारीगाव पुलांची दुरुस्ती सुरू

वाहने अन्य मार्गांवर वळवणार

ठाणे : उद्या बुधवारपासून साकेत आणि खारीगाव पुलांच्या दुरुस्तीच्या कामांचा ‘मुहूर्त’ अखेर मिळाला. या पुलांच्या विविध कामांमुळे वाहनांना अन्य मार्गांवरुन प्रवास करावा लागणार असल्याची माहिती ठाणे वाहतूक पोलीस वरिष्ठ अधिका-यांनी दिली.

मुंबई ते नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. तीनवरील साकेत ब्रिज आणि खारीगाव ब्रिजवरील दोन मार्गिकांपैकी एकावेळी लेनच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाावर वळवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला.

भिवंडी नाशिककडे जाणा-या जड व अवजड वाहनांना फक्त रात्री १० ते पहाटे ५ दरम्यान प्रवेश देण्यात येणार आहे. जेएनपीटीवरुन नाशिक दिशेने जाणा-या वाहनांना खालापूर टोलमार्गे इच्छित जाऊ शकतील, असेही सांंगण्यात आले.
यासाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आली. जेएनपीटी, घणसोली, नवी मुंबई, दक्षिण भारतातून पुणे मार्गे कळंबोली सर्कलमार्गे नवी मुंबई, तळोजामार्गे नाशिक, गुजराथ, उत्तर भारतात जाणा-या वाहनांना कल्याण फाटा व शिळफाटा मार्गे मुंब्रा बायपास जाण्याकरीता शिळफाटा येथून पूर्णवेळ प्रतिबंध करण्यात आला आहे.

जेएनपीटी, कळंबोली, नवी मुंबई उरणमार्गे महापे सर्कलकडून शिळफाटामार्गे गुजराथ, भिवंडीकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना शिळफाटाकडे येण्यासाठी पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. यामुळे पर्यायी मार्ग कळंबोली, शिळफाटा येथून डावे वळण घेऊन महापे जवळील हॉटेल, रबाळे एमआयडीसीमार्गे रबाळे नाका, ऐरोली पटणी सर्कल, डावीकडे वळण घेऊन ऐरोली सर्कल, पुलावरुन मुुलुंड ऐरोली पुलावरून पूर्वद्रुतगती महामार्ग, मुलुंड आनंदनगर टोलनाकामार्गे माजिवाडा ब्रीज खालून माणकोली, अंजूरमार्गे वाहने जातील.