माथाडींच्या लाक्षणिक संपाचा फटका
नवी मुंबई : माथाडी कामगार संघटनेने एक फेब्रुवारीला एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारल्याने भाज्यांच्या मागणीत मंगळवारी वाढ झाली. त्यामुळे भाजीपाल्याच्या ५०० ते ६०० गाड्या आवक होऊनही भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झालेली आहे. भेंडी, गवार, हिरवी मिरची, वाटाणा, वांगी, फ्लॉवर या भाज्यांना अधिक मागणी असल्याने दरात वाढ झाली आहे.
१ फेब्रुवारीला बाजार समिती १००टक्के बंद असल्याने मंगळवारी एपीएमसी बाजारात भाजीपाल्याच्या ५००-६०० गाड्या दाखल झाल्या आहेत. बाजारात जादा आवक होऊन ही १ दिवस मार्केट बंद असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. विशेषतः हॉटेल व्यवयसायिकांकडून अधिक मागणी होती. त्यामुळे भेंडी, गवार , हिरवी मिरची,वाटाणा, वांगी, फ्लावर या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी बाजारात भेंडी ११४४ क्विंटल, फ्लॉवर ३२८९, गवार १९२ क्विंटल, टोमॅटो १४८१ क्विंटल, हिरवा वाटाणा ३३५० क्विंटल, हिरवी मिरची ३४०८ क्विंटल आणि वांगी २८३ क्विंटल आवक झाली आहे.
घाऊक भाजी बजारभाव (प्रतिकिलो)
भाजी आधीचे आत्ताचे
भेंडी ५४-५६ ६०-६५
हिरवी मिरची ३४-३६ ४०-४४
टोमॅटो १४-१५ १०-१२
फ्लॉवर १६-१८ २४-३६
वाटाणा १२-२० ३०
वांगी ३०-३२ ३६-४०
गवार ६५-६५ ७०