पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांना राष्ट्रपती पदक

ठाणे : सेवा अभिलेख निरंतर अतिउत्कृष्ट असलेल्या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक दीपक जाधव यांना यंदाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरवण्यात आले.

त्यांचा सेवा अभिलेख निरंतर अतिउत्कृष्ट (आऊटस्टॅेडिंग ए प्लस) असा आहे. त्यामुळेच समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
श्री. जाधव हे पोलीस सह-आयुक्त यांचे वाचक अधिकारी आहेत. जाधव हे मानपाडा पोलीस ठाण्याशी संलग्न्न आहेत. त्यांना विशेषत: संपूर्ण भारतातून एकूण ५४ आणि राज्यातील चार पोलीस अधिकारी यांच्यातून हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला.

जाधव यांचा जन्म प्रसिद्ध कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या सातारा जिल्ह्यातील मर्ढेगाव येथे झाला. सन १९८५ मध्ये ते महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाले. नोकरी करताना त्यांनी बी.कॉम, एल.एल.बीचे (मुंबई विद्यापीठ) शिक्षण घेतले आहे. सेवा कालावधीत वरिष्ठांनी त्यांना ५५० पेक्षा अधिक उत्कृष्ट सेवा पत्र , प्रशंसनीय पत्र, रोख बक्षिसे देऊन गौरवले आहे.