३० कोटी ६२ लाख रुपयांचा भरणा
ठाणे : थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेल्या ग्राहकांसाठी महावितरणने आणलेल्या अभय योजनेचा लाभ घेणा-या कल्याण आणि भांडुप परिमंडळातील ७,८९१ ग्राहकांना पुन्हा वीज जोडणी मिळाली आहे.
या दोन्ही परिमंडळातील १३,८४८ ग्राहकांनी योजनेत सहभाग घेत ३० कोटी ६२ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला. त्यांना थकीत रकमेवर विलंब आकार व व्याज-माफीसह मूळ थकबाकीमध्ये ५ ते १० टक्क्यांची सवलत मिळाली. येत्या मार्च अखेर योजनेची मुदत संपत असून लाभापासून वंचित दोन्ही परिमंडळातील उर्वरित ग्राहकांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करून संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
अभय योजनेनुसार मार्च-२०२४ अखेर किंवा तत्पूर्वी वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेले लघुदाब व उच्चदाब ग्राहक (सार्वजनिक पाणीपुरवठा व कृषीपंप ग्राहक वगळून) योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. थकबाकीची मुळ रक्कम एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात यात भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णत: माफ होणार आहे. योजनेतील सहभागी ग्राहकांना एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात मूळ थकबाकी भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तर थकबाकी एकरकमी भरणा-या उच्च दाब ग्राहकांना मूळ थकबाकींवर पाच टक्के आणि लघुदाब ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सवलत मिळत आहे.
मूळ थकबाकी एकरकमी अथवा ३० टक्के रक्कम भरुन योजनेत सहभागी होता येईल. त्यानंतर मागणीप्रमाणे तात्काळ पुन:र्जोडणी अथवा नवीन वीजजोडणी मिळेल. त्यासाठी पात्र ग्राहकांनी ‘‘एचटीटीपीएस:// पोर्टलवर केवळ आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
कल्याण परिमंडठीतील ९,५७८ ग्राहकांनी अभय योजनेत सह•ाागी होण्यासाठी अर्ज केला आहे. यातील ८,३९४ ग्राहकांनी आत्तापर्यंत १५ कोटी ४१ लाख रुपयांचा भरणा केला असून त्यातील मागणी करणा-या तब्बल ५,२५० जणांना पुन:र्जोडणी अथवा नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. तर भांडुप परिमंडळातील ५,९७० ग्राहकांनी अभय योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे.
यातील ५४५४ ग्राहकांनी आत्तापर्यंत १५ कोटी २१ लाख रुपयांचा भरणा केला असून त्यापैकी २६४१ जणांना त्यांच्या मागणीप्रमाणे पुन:र्जोडणी किंवा नवीन वीजजोडणीची मागणी केली आहे.