ठाणे स्थानकात उद्या रात्री पॉवर ब्लॉक

गर्डर बसविण्याचे काम होणार

ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकात शनिवार २१ सप्टेंबर रोजी रात्री साडे दहापासून रविवार २२ सप्टेंबरच्या पहाटे साडे चार वाजेपर्यंत पादचारी पूल गर्डर बसवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक रेल्वेने घोषित केला आहे.

या ब्लॉक दरम्यान सहाव्या मार्गावर चालणाऱ्या मेल व एक्स्प्रेस गाड्या कल्याण-दिवा ते मुलुंड-विद्याविहार स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यकता नसल्यास रेल्वेने प्रवास करणे टाळावे व सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात ठाणे पूर्व येथील चेंदणी बंदर ते ठाणे पश्चिम यांना जोडणाऱ्या पुलाचे गर्डर बसविण्याचे काम मध्ये रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान सुटणाऱ्या उपनगरीय सेवा आणि ठाणे करीता वाशी येथून २१.३७ ते पनवेल येथून २३.१८ वाजेपर्यंत जाणाऱ्या उपनगरीय सेवा रद्द राहतील.

डाऊन ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ठाणे येथून २१.४१ वाजता सुटेल आणि वाशी येथे २२.१० वाजता पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी येथून २१.२४ वाजता सुटेल आणि ठाणे येथे २१.५३ वाजता पोहोचेल. डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाणे येथून ०५.१२ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०६.०४ वाजता पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशी येथून ०६.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०६.५९ वाजता पोहोचेल.

सहाव्या मार्गावर चालणाऱ्या मेल व एक्स्प्रेस गाड्या कल्याण-दिवा ते मुलुंड-विद्याविहार स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. 11072 कामायनी, 11100 मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 12052 मडगाव- मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, 11082 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, 22120 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस, 22537 गोरखपूर-मुंबई कुशीनगर एक्स्प्रेस, 11062 जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, 11020 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, 18030 शालीमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, 18519 विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, 20104 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.