देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ते ८३ वर्षांचे होते. काल मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनऊ येथे झाला होता. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना दिल्लीतील साकेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
‘‘मी महाराष्ट्राला माझा पिता आणि बंगालला माता मानतो. कारण माझ्या कलेची सुरूवात बंगालमध्ये झाली; पण मला अनेक मानसन्मान व नावलौकिक महाराष्ट्राने दिले.” असं पंडित बिरजू महाराज यांनी म्हटलं होतं.