ठाणे पेट फेस्टचे आयोजन

ठाणे : डॉग्ज वर्ल्ड इंडियातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या पाळीव प्राण्यांसाठीच्या ठाणे पेट फेस्टचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

ठाणे आणि मुंबईतील पेट स्टोअर रिटेल चेन डॉग्ज वर्ल्ड इंडियाने सादर केलेला ठाणे पेट फेस्ट (TPF) ठाण्यातील सर्वात मोठा पेट फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो. या फेस्टमध्ये पाच हजार अभ्यागत आणि दोन हजार पाळीव प्राणी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. हा दोन दिवसीय फेस्ट ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी खेवरा सर्कल, मानपाडा, ठाणे (प) येथे आयोजित केला आहे.

ठाणे पेट फेस्ट प्रत्येकासाठी काही ना काही ऑफर करतो. पाळीव प्राण्यांचे पालक आणि फीडर्सपासून बचावकर्ते आणि पाळीव प्राणी प्रेमी ज्यांच्याकडे पाळीव प्राणी नाहीत पण प्राणी जगाविषयी उत्सुकता आहे त्यांचेही उत्सवात सहभागी होण्यासाठी स्वागत आहे, असे आयोजकांनी सांगितले.

येथील कौटुंबिक अनुकूल वातावरण मुलांना सर्व प्रकारचे प्राणी पाहण्यासाठी सुरक्षित करते. इव्हेंटमध्ये पाळीव प्राण्यांच्या ॲक्टिव्हिटीज, मनोरंजन यांचा समावेश आहे. डॉग प्ले झोनमध्ये कुत्र्यांसाठी रॅम्प वॉक आणि मजेदार ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. तसेच विविध जातींची वैशिष्ट्ये असलेल्या विदेशी कॅट शोचा आनंद अनुभवता येणार आहे. ⁠ॲक्वेरियम झोनमध्ये आकर्षक ॲक्वास्केप प्रदर्शनांद्वारे विदेशी मासे आणि जलचरांचे सौंदर्य तर एव्हियन झोनमध्ये वेगवगेळे पक्षी पाहता येणार आहेत. याव्यतिरिक्त मुख्य कार्यक्रमाचे कुत्र्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, कुत्र्यांचा फॅशन शो, योगा आणि इतर अनेक शो चा आनंद घेता येणार आहे.

फेस्ट दरम्यान पेट्ससाठी वेगवेगळे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. ⁠पाळीव प्राण्यांसाठीचे सामान, मासे/पक्ष्यांसाठी अन्न, पाळीव प्राणी, पाळीव प्राण्यांची सेवा करणारे यांचे स्टॉल्स असणार आहेत. तसेच खाण्यापिण्याचे स्टॉलही मांडण्यात येणार आहेत. ठाणे पेट फेस्ट हा पाळीव प्राणी प्रेमी आणि त्यांच्या प्रेमळ साथीदारांसाठी एक रोमांचक कार्यक्रम आहे. अधिक माहिती आणि तिकिटांसाठी, ठाणे पेट फेस्टच्या वेबसाइटला (www.dogsworldindia.com) भेट द्या किंवा इव्हेंट अपडेट्ससाठी इन्स्टाग्रामवर (@thanepetfest) फॉलो करा.