गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकास अटक

भाईंदर: बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक इसम गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) व जिवंत काडतूस विक्रीकरिता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सदर माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचून फाउन्टन हॉटेलच्या समोर मुंबईकडे जाणा-या बस स्टॅन्डच्या रस्त्यावर संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) व एक जिवंत काडतुस मिळून आले. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध काशिगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भाईंदर परिसरात उत्तर प्रदेशातून अग्निशस्त्र घेऊन येणाऱ्याची खबर मिळताच पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील फाऊंटन हाॅटेल येथे सापळा रचला. हॉटेलच्या समोर मुंबईकडे जाणा-या बस स्टॅन्डच्या रस्त्याच्या बाजुला गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहीती व वर्णनाप्रमाणे एक संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव शिवकुमार पासवान असून तो जि. फतेपुर, उत्तर प्रदेश येथे राहत असल्याचे सांगितले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) व एक जिवंत काडतुस इत्यादी मिळुन आले. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध काशिगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबतचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पलिस उप निरीक्षक अभिजीत लांडे हे करत आहेत.