ओमेगा बिझनेस पार्क बिझनेससाठी अनुकूल

ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये स्थित, ओमेगा बिझनेस पार्क हा व्यवसायिकांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि आकर्षक केंद्रबिंदू आहे. या बिझनेस पार्कमध्ये असलेल्या चार वेगवेगळ्या कार्यालयांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत. प्रत्येक कार्यालय आपापल्या खास सोयी-सुविधा, विस्तृत क्षेत्रफळ, स्पर्धात्मक दर आणि विविध सुविधांच्या माध्यमातून व्यवसायिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहे.या लेखामध्ये आपण ओमेगा बिझनेस पार्कमधील विविध कार्यालयांच्या वैशिष्ट्यांची सखोल माहिती घेणार आहोत ज्यामुळे आपणास आपल्या व्यवसायासाठी योग्य जागेची निवड करण्यास मदत होईल. वाचकांना या लेखाद्वारे बिझनेस पार्कचे सर्वांगीण दर्शन आणि प्रत्येक कार्यालयाची खासियत समजावून घेता येईल.

मोक्याच्या ठिकाणी ऑफिस जागा

आम्ही आमच्या ऑफिससाठी अनेक आयटी पार्क पाहिले पण आम्हाला ठाण्यातील ओमेगा आयटी पार्क खूप आवडले. ओमेगा आयटी पार्कची जागा मोक्याच्या ठिकाणी असल्याने आम्ही याठिकाणी ऑफिस घ्यायचे ठरवले. या पार्कमध्ये अगदी ३५० पासून – २००० चौरस फुटांपर्यंत ऑफिसेस असल्यामुळे खूप पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या गरजेप्रमाणे आपण ऑफिस निवडू शकतो. आयटी पार्कची खासियत म्हणजे येथे १०० टक्के पॉवर बॅकअप असल्यामुळे आपली कामे सलग सुरु राहू शकतात. त्याचबरोबर व्हिट्रीफाइड टाईल्समुळे या बिझनेस पार्कची शोभा अधिक वाढते.

(शिवाकुमार कोनार, इन्व्हिन्टेक कंपनी)
—————————————

व्यवसाय करण्यासाठी भौगोलिकदृष्ट्या उत्तम ठिकाण

आमचे आधीचे ऑफिस कांदिवलीच्या एका मॉलमध्ये होते. तिथे बिझनेससाठी तितके पोषक वातावरण नव्हते. आम्ही नवीन ऑफिसच्या शोधात होतो आणि आम्ही ऑफिस ओमेगामध्ये घ्यायचे ठरवले. येथे अनेक छोटे-मोठे व्यवसाय असल्यामुळे आमचा एक चांगला ग्रुप तयार झाला आहे. एकमेकांचा व्यवसाय वाढण्यासाठी या ग्रुपचा उपयोग होत असतो. वातावरण खेळीमेळीचे असल्यामुळे कर्मचारी वर्ग देखील आनंदी आहे. ठाणे आणि त्यात वागळे इस्टेट हे व्यवसाय करण्यासाठी भौगौलिकदृष्ट्या उत्तम ठिकाण आहे. आमच्या क्लायंट तसेच कर्मचारी वर्गाला प्रवास करण्यासाठी अधिक सोयीचे आहे.

(संकेत निर्मल – डिफेन्सनेट सिक्युरिटी एल एल पी)
———————–

बिझनेससाठी पोषक वातावरण

एकत्व ग्रुपच्या कामाबद्दल आधी ऐकले होते. त्यांच्याकडे अनेक आयटी पार्क साकारल्याचा अनुभव असल्यामुळे आम्ही त्यांच्या ओमेगा आयटी पार्कमध्ये ऑफिस घ्यायचे ठरवले. आज आम्ही समाधानी आहोत. सीसीटीव्ही सुरक्षा आणि अग्निशमन व्यवस्था, वातानुकूलित लॉबी, अत्याधुनिक पार्किंग आणि लिफ्ट यंत्रणा ही या प्रोजेक्टची वैशिष्ट्ये आहेत असे मी समजतो. बिझनेससाठी वातावरण खूप अनुकूल आहे, त्यामुळे आपला सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो.

(प्रशांत मोरे – मरीन कन्सल्टन्ट अँड सर्व्हेअर्स)

———————————————-

व्यवसायिक दृष्ट्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध

ओमेगा हे बिझनेस पार्क सर्व सोयीसुविधांनीयुक्त असे बिझनेस पार्क ठाण्यातील वागळे इस्टेट भागात आहे. येथील वातावरण सुरक्षित आहे. त्याचसोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे मिळणाऱ्या सोयीसुविधा व व्यवस्थापन उत्कृष्ट आहे. ओमेगा बिझनेस पार्कमध्ये स्वछतेकडे विशेष लक्ष दिले जाते. पॉवर बॅकअपचा पर्याय सुद्धा येथे उपलब्ध आहे. पुरेशी पार्किंग व्यवस्थाही येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कॅम्पसमध्ये बँक आणि हॉस्पिटल यासारख्या सेवांसह ऑफिस इमारतीच्या जवळच जेवणाचे उत्तम पर्याय आहेत.

स्मिता तिवारी- आर्टीक्लॅड