ठाणे : संपूर्ण ठाणे शहरातील प्रवाशांचा दररोजचा प्रवास सुखकारक होण्यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत सहा इलेक्ट्रिक बसेस् आल्या असतानाच आणखी पाच बसगाड्या सेवेत शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर धावणार आहेत. मात्र ही सेवा सुरु करण्या तत्पूर्वी, ‘आरटीओ’ परवानगी घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
काही नव्या बसगाड्या जानेवारीत आल्या आहेत तर उर्वरित टीएमटीच्या नव्या बसेस फेब्रुवारीत येणार आहेत. या बसेस् गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यांवर चालवण्यात येईल. यामुळे रस्त्यांवर प्रवाशांचे जथ्थे कमी झालेले दिसतील, असा दावा एका अधिका-याने केला.
या नवीन बसेसची विविध वैशिष्ट्ये आहेत. या बस इलेक्ट्रिक असल्यामुळे कार्बन डाय ऑक्साईड बाहेर पडणार नाही, प्रत्येक बस वातानुकूलित असल्यामुळे प्रवाशांचा प्रवास ‘थंडा थंडा-कुल कुल’ होणार आहे. या बसमध्ये बाहेरच्या आवाजाचा किंवा बस धावताना होणा-या आवाजाचेही प्रदूषण होणार नाही. बसचा प्रवास सुरु असताना खड्ड्यांचे धक्के न बसण्यासाठी ‘एअर सस्पेंशन’ ची यंत्रणा बसवली आहे. अशा सुविधांनी असलेल्या नव्या बसेसमुळे ठाणे परिवहन सेवेला चांगले उत्पन्न मिळणार आहे, असे एका अधिका-याने सांगितले. अशा बनावटीच्या आणखी बसेस ् ठाणेकरांच्या सेवेकरीता येणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळली.