मुलुंड ते पलावा अर्ध्या तासात! डिसेंबरपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार

ठाणे: ऐरोली ते काटई नाका येथे ‘फ्री वे’ एकदा तयार झाल्यानंतर तब्बल बारा किलोमीटर लांबीचा ऐरोली काटई नाका खुला होणार आहे. त्यामुळे ‘फ्री वे’मुळे मुंबई ते कल्याण या मार्गावर प्रवास करणा-या लोकांना थेट आणि जलद प्रवेश प्रदान करणार आहे. या प्रकल्पामुळे बदलापूरदेखील कल्याण आणि ठाण्याजवळ येणार आहे.

या प्रकल्पाचा टप्पा एक आणि टप्पा दोन डिसेंबर 2024पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या ‘फ्री वे’मुळे अवजड वाहतूक लक्षणीयरीत्या कमी होऊन या भागातील ‘कनेक्टिव्हिटी’ वाढेल आणि पलावा हा संपूर्ण भाग मुंबईच्याजवळ येऊन प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल,असा अंदाज प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिका-यांनी मांडला आहे.

शिवाय मध्य रेल्वेच्या मंजुरीमुळे पलावा जंक्शन उड्डाणपुलाचेही काम जलद गतीने सुरू होणार, अशी शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रवास आणखी कमी होईल.
ऐरोली-काटई नाका मुक्तमार्ग तीन टप्प्यात बांधला जात आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूर रोड आणि ‘जुना एमएच ४ दरम्यान पारसिकमार्गे १.७ किलोमीटर दुहेरी बोगद्यातून जोडणार दुवा असणार असेल आणि ऐरोली पूल ते ठाणे-बेलापूर रोडला जोडणारा उन्नत रस्ता आहे आणि त्याच्यानंतर ‘एमएच 48’आणि काटईनाका दरम्यान उन्नत रस्त्याने थेट जोडणी करणारा आहे.
त्यानंतर ऐरोली-काटई नाका एलिव्हेटेड रोडमुळे मुलुंडला पोहचण्यासाठी अवघे वीस मिनिटे आणि मुलुंडला पोहोचण्यासाठी 30 मिनिटे लागतील,अशी माहिती अधिका-यांनी दिली.

सध्या बोगद्याच्या काळसेकर बाजूला कनेक्टिंग रोडचे काम सुरू आहे. रोडचे सर्व काम पूर्णत्वाकडे गेल्यानंतर ऐरोली पुलाच्या जोडणीचे काम जवळपास पूर्णत्वास येणार आहे,असे सूत्रांनी सांगितले.