ठाणे : मोबाईल सेवा बंद राहणे आणि फायबर ऑप्टिकल केबल यंत्रणा बंद राहिल्यानंतर प्रत्येक ग्राहकाचा जीव वर-खाली होतो. अशी अवस्था शुक्रवारी, २७ जानेवारी रोजी ठाणे, वाशी आणि मुलुंडमधील हजारो ग्राहकांची झाली होती. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत यात सुधारणा झाली नव्हती. यामुळे दिवसभर अगणित ग्राहकांची कुचंबणा झाली. यावर विसंबून असलेल्या सर्व खाजगी आणि सरकारी यंत्रणा बंद पडल्या होत्या. त्या सायंकाळी ७ वाजल्यानंतर सुरु झाल्याची माहिती ‘मटेनिली’मधील सूत्रांनी दिली.
फायबर-ऑप्टिक केबल, ज्याला ऑप्टिकल-फायबर केबल म्हणूनही ओळखले जाते. ऑप्टिकल फायबर खूप मजबूत असतात, परंतु उत्पादन प्रक्रियेत अंतर्भूत असलेल्या अपरिहार्य सूक्ष्म पृष्ठभागाच्या त्रुटींमुळे ताकद खूपच कमी होते. ही विद्युत केबलसारखीच एक असेंब्ली असते परंतु त्यात एक किंवा अधिक ऑप्टिकल फायबर असतात. जे प्रकाश वाहून नेण्यासाठी वापरले जातात. ऑप्टिकल फायबर घटक विशेषत: वैयक्तिकरित्या प्लास्टिकच्या (पॉलिमर) थरांनी लेपित केलेले असतात आणि केबल वापरल्या जाणा-या वातावरणासाठी योग्य असलेल्या संरक्षक ट्यूबमध्ये असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या केबल वेगवेगळ्या कारणांकरीता वापरल्या जातात. लांब-अंतर दूरसंचार किंवा इमारतीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हाय-स्पीड डेटा कनेक्शन प्रदान करणे, हा त्याचा महत्वाचा उपयोग केला जातो.
फायबर ऑप्टिकल यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याचे निदर्शनास येताच ‘मटेनिली’चे वरिष्ठ अभियंते, तंत्रज्ञ आणि संबंधित कर्मचा-यांची तारांबळ उडाली. कारण ही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने त्यावर विसंबून असलेल्या सर्व सेवाही ठप्प झाल्याने संबंधितांचेही दररोजचे काम थांबले होते. अखेरीस सायंकाळी सातनंतर ही यंत्रणा पूर्ववत् झाल्याने त्यांनाही हायसे वाटले.