काय पहिल्यांदाच WPLमध्ये GG नमवतील MIला?

WPL २०२५च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सकडून हृदयद्रावक पराभव पत्करावा लागला. मेग लॅनिंग आणि तिच्या साथीदारांनी सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर हरमनप्रीत कौरच्या संघावर मात केली. दुसरीकडे, गुजरात जायंट्सने त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात यशाची चव चाखली. आता, MI आणि GG हे दोन संघ मंगळवारी वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत.

 

आमने-सामने

WPLच्या पहिल्या दोन्ही हंगामात चारही सामने जिंकून मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सविरुद्ध वर्चस्व राखले आहे.

 

संघ

मुंबई इंडियन्स: अमनजोत कौर, अमिलिया कर, क्लोई ट्रायॉन, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, जिंतिमनी कलिता, नॅट सिव्हर-ब्रंट, सायका इशाक, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), शबनीम इस्माईल, एस सजना, अमनदीप कौर, कीर्थना बालक्रिष्णन, जी कमलिनी (यष्टीरक्षक), संस्क्रीती गुप्ता, अक्षिता माहेश्वरी, नदिन डी क्लर्क

गुजरात जायंट्स: ॲश्ले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी (यष्टीरक्षक), दयालन हेमलथा, हरलीन देओल, लॉरा वूल्फार्ट, शबनम शकील, तनुजा कंवर, फिबी लिचफिल्ड, मेघना सिंग, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, मन्नत कश्यप, सायली सातघरे, सिमरन शेख, डिआंड्रा डॉटीन, प्रकाशिका नाईक, डॅनिअल गिब्सन

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

नॅट सिव्हर-ब्रंट: मुंबई इंडियन्सच्या या विश्वासू फलंदाजाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अपराजित ८० धावा केल्या. या इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूने तिच्या मनोरंजक खेळीत १३ चौकार लगावले. गोलंदाजी करताना तिने एक गडी देखील बाद केला.

हरमनप्रीत कौर: मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने तिच्या WPL २०२५ मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली आहे. तिने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात केवळ २२ चेंडूत ४२ ठोकून गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या.

ॲश्ले गार्डनर: गुजरात जायंट्सच्या कर्णधाराने WPL २०२५मध्ये अप्रतिम पद्धतीने संघाचे नेतृत्व स्वीकारले आहे. याशिवाय, तिने बॅट आणि चेंडूने आतापर्यंतच्या दोन सामन्यात भन्नाट खेळी केली आहे. एकामागोमाग अर्धशतके झळकावून ती सध्याची ऑरेंज कॅपधारक आहे. तिने चार विकेट्सही घेतल्या आहेत.

डिआंड्रा डॉटिन: वेस्ट इंडिजच्या चमकदार अष्टपैलूने WPL २०२५च्या पहिल्या दोन चकमकींमध्ये प्रभावित केले आहे. तिने ५८ धावा रचल्या आहेत आणि तीन विकेट्स पटकावल्या आहेत.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: फेब्रुवारी १८, २०२५

वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता

ठिकाण: कोटंबी स्टेडियम, वडोदरा

प्रक्षेपण: जिओहॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क