दोन महानगरींच्या लढाईत कोण वर्चस्व गाजवणार?

वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) 2023 च्या अंतिम फेरीतील स्पर्धक मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या हंगामात पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध खेळायला सज्ज आहेत. मंगळवारी हे दोन संघ दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर आमने सामने येतील. या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील 11 सामने आजपासून दिल्लीत खेळवले जाणार आहेत.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी 23 फेब्रुवारी रोजी या आवृत्तीचा पहिला सामना खेळला आणि मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. हरमनप्रीत कौरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तथापि या सामन्यासाठी तिची उपलब्धता ही दुखापतीतून बरी होण्यावर अवलंबून आहे. हरमनप्रीत मागील दोन सामन्यात खेळण्यापासून हुकली.

या दोन्ही संघांनी एकूण चार सामने खेळले असून त्यापैकी तीन जिंकले आहेत. त्यांचे समान गुण आहेत, परंतु चांगल्या नेट रन रेटमुळे, दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत मुंबई इंडियन्सपेक्षा पुढे आहेत.

 

WPL मध्ये आमने सामने

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी एकमेकांविरुद्ध चार सामने खेळले आहेत, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने तीन आणि दिल्ली कॅपिटल्सने एक जिंकला आहे.

 

संघ

मुंबई इंडियन्स: हेली मॅथ्यूज, नॅट सिव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), अमेलिया कर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक, क्लोई ट्रायॉन, जिंतिमनी कलीता, अमनदीप कौर, हुमैरा काझी, इस्सी वोंग, प्रियांका बाला, फातिमा जाफर

दिल्ली कॅपिटल्सशफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राधा यादव, शिखा पांडे, पूनम यादव, तीतस साधू, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, अश्विनी कुमारी, अपर्णा मोंडल, स्नेहा दीप्ती 

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

यास्तिका भाटिया: मुंबई इंडियन्सची डावखुरी सलामीवीर तिच्या संघासाठी 30 च्या सरासरीने आणि 136 च्या स्ट्राईक रेटने 121 धावा करत तिच्या संघासाठी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिच्या नावावर एक अर्धशतक देखील आहे, जे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आले त्यांच्या पहिल्या फेरीतील सामन्यात आले होते. यष्टीमागे, तिने सहा गडी बाद करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

अमेलिया कर: मुंबई इंडियन्सच्या अष्टपैलू खेळाडूने या WPL 2024 च्या चार सामन्यांमध्ये बॅट आणि चेंडूने चांगले प्रदर्शन केले आहे. या लेगस्पिनरने एका चार विकेट हॉलसह सात विकेट्स घेतल्या आहेत आणि बॅटने 118 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये सर्वोत्तम 40 नाबाद या खेळीचा समावेश आहे.

मेग लॅनिंग: दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने चार सामन्यांत दोन अर्धशतकांसह 148 धावा केल्या आहेत. ती तिच्या संघासाठी ॲलिस कॅप्सीसोबत सर्वाधिक धाव करणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताची सलामीची फलंदाजी तिच्या संघाला चांगली सुरुवात करण्यासाठी जबाबदार आहे आणि तिचे नेतृत्व अभूतपूर्व दिसून आले आहे.

जेस जोनासेन: दिल्ली कॅपिटल्सची डावखुरी फिरकीपटू पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघाचा भाग नव्हती. पण पुढच्या दोन सामन्यात तिला संधी मिळाल्यावर तिने त्या संधीचे सोने केले. तिने अवघ्या सातच्या सरासरीने आणि 5.38 च्या इकॉनॉमीने सहा विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजी व्यतिरिक्त ती फलंदाज म्हणून लक्षणीय योगदान करू शकते.

 

खेळपट्टी

2016 मध्ये खेळल्या गेलेल्या सहा महिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामने या ठिकाणी आयोजित केले गेले. सहा सामन्यांपैकी, दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी, अर्थातच धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या संघांनी, चार सामने जिंकले आहेत. येथे सर्वाधिक धावसंख्या 132 आहे आणि सर्वात कमी 77 आहे. येथे धावा करणे इतके सोपे नाही. गोलंदाज मोठी भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे.

 

हवामान

भारतात सध्या सुरू असलेला हिवाळा पाहता, उत्तरेकडे असणारी दिल्ली खूप थंड असेल. तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे. आर्द्रता 39% असेल. ढगांचे आवरण राहणार नाही आणि पावसाची शक्यता नाही.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: 5 मार्च 2024

वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता

स्थळ: अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

प्रसारण: जिओ सिनेमा, स्पोर्ट्स 18