मेट्रो ४: पायलिंगची कामे ९० टक्क्यांहून जास्त!

ठाणे : ठाणेकरांचे लक्ष मेट्रो ४ मार्गाकडे असतानाच त्याच्या पायलिंगच्या कामांची सद्यस्थिती ९० टक्क्यांहून जास्त झाली आहे. मात्र प्रकल्प पूर्णत्वासाठी २०२५ सालच उघडणार आहे, अशी माहिती ‘एमएमआरडीए’तील सूत्रांनी दिली.

वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग 4 हा 32.32 किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. मार्गामध्ये एकूण 30 स्थानके असणार आहेत. या मार्गात सध्याचा ईस्टर्न एक्स्प्रेस रोडवे, मध्य रेल्वे, मोनोरेल आणि सध्या सुरू असलेला मेट्रो मार्ग 2ब (डी एन नगर ते मंडाळे), मेट्रो मार्ग 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो मार्ग 6 (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) यांच्यात परस्पर जोडणी प्रदान करणार आहे.या मार्गात मुंबईतील व्यावसायिक आणि महत्त्वाच्या भौगोलिक ठिकाणांवर या मार्गांची स्थानके अवलंबून असल्याने कामे ‘वेग’ घेत नसल्यामुळे आणि बरीच महत्वाची कामे २७ कामांवर विसंबून आहेत.

सध्याच्या कामांची स्थिती रस्त्याच्या परिस्थितीनुसार 50टक्के ते 75टक्केपर्यंत कमी झाली असल्यामुळे, भविष्यात सुरु होणा-या कामांना ‘लाल सिग्नल’ मिळाल्याने पुढील कामांनाही ‘खिळ’ बसली आहे. त्यामुळे किमान २५ महत्वाची कामे ठप्प झाल्यानंतर त्याचा परिणाम अन्य कामांवर होतो आणि झाली आहेत, असे ‘पायलिंग’ विभागातील अधिकार-याने सांगितले.
पायलिंगच्या कामांमध्ये वायडक्ट आणि स्थानके महत्वाची असल्याने, त्यातील संबंधित आणि त्यावर विसंबून असलेल्या कामांची सद्यस्थिती ८९.२ टक्क्यांहून पूर्ण झाली. तसेच ‘पाईल कॅप’च्या कामांमध्ये वायडक्ट आणि स्थानके अवलंबून असतात, सध्या ती ८५ टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. पिअर कॅप कास्टींगची कामे ७३.६ टक्के पूर्ण आणि वायडक्टची कामे ७३ टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत, असे सांगण्यात आले.