ठाणे : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग 29 डिसेंबर 2024 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक चालवणार आहे.
ट्रान्स हार्बर लाईन ब्लॉक विभाग सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेल येथून ठाण्याकडे जाणा-या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलकडे जाणा-या पनवेलच्या दिशेने जाणा-या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत रद्द राहणार आहेत.
ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.
छशिमट मुंबई ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.48 ते दुपारी 3.18 पर्यंत छशिमट येथून सुटणा-या डाऊन धीम्या सेवा छशिमट मुंबई आणि विद्याविहार स्थानकांच्या दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबण्यात येणार आहे आणि पुढे विद्याविहारला डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.
सकाळी 10.19 ते दुपारी 3.19 पर्यंत घाटकोपरहून अप धीम्या सेवा विद्याविहार आणि छशिमट मुंबई स्थानकांच्या दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांच्या दरम्यान थांबणार आहेत.