तंदूरी फणस बनवा आता घरच्याघरी 

आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करणे अत्यावश्यक आहे. आजच्या सदरात आपण दोन पदार्थांच्या रेसिपी बघणार आहोत. त्यापैकी एग बेनेडिक्ट, इंग्लिश मफिनवर आधारित असून हा एक सामान्य अमेरिकन नाश्ता किंवा ब्रंच डिश आहे,  तर तंदूरी फणस, मसालेदार तंदूरी मिरचीचं अतिशय स्वादपूर्ण असलेले एक स्वादिष्ट व्यंजन आहे. तुम्ही देखील घरी या डिशेश ट्राय करून बघा.

तंदूरी फणस

साहित्य :

कच्चा फणस – 200 ग्रॅम
त्रिशंकू दही – 40 ग्रॅम
मोहरी तेल – 20 मि.ली
काश्मिरी मिरची पावडर- 20 ग्रॅम
जिरे पावडर -5 ग्रॅम
गरम मसाला पावडर-10 ग्रॅम
इलायची पावडर -2 ग्रॅम
धणे पावडर -5 ग्रॅम
मीठ – 5 ग्रॅम

कृती :  

* फणसाचे तुकडे अर्धवट शिजवून घ्या.
* आता हे तुकडे सर्व मसाले एकत्र करून या मसाल्यात मॅरीनेट करून ३० मिनिटे बाजूला ठेवा.
* आता तुकडे एका तंदूर स्टिकमध्ये व्यवस्थित लावून 15 मिनिटे भाजून घ्या.
* सजवा आणि पुदिन्याच्या चटणी बरोबर गरमागरम सर्व्ह करा.

सनी पावसकर 
काठ अन घाट