स्पॅनिश भाषा शिका आणि परदेशात करिअर करा

(कॉमन इंट्रो) भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांसोबत वावरणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला कुतूहल वाटते. परदेशी पाहुण्यांसोबत त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचे विविध भाषांवरील प्रभुत्व आपले लक्ष वेधून घेतात. विविध भाषा शिकल्याने करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात. त्यासाठी हल्ली या भाषा शिकण्याकडे अनेकांचा कल पाहायला मिळतो. स्पॅनिश भाषा शिकल्याने वेगवेगळ्या क्षेत्रात करियरसाठी या भाषेचा अभ्यास हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या भाषेबाबद्दल आज जाणून घेऊया…

आजच्या जागतिकीकरणाच्या जगात परदेशी भाषा शिकल्याने करिअरच्या संधी वाढू शकतात. स्पॅनिश, जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक असून तुम्हाला स्पॅनिश भाषा येत असेल तर तुम्ही जगातल्या ८० टक्के माणसांशी बोलू शकता. जर तुम्हाला स्पॅनिश बोलता येत असेल तर तुम्हाला परदेशातही तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.

स्पॅनिश ही जगभरात बोलल्या जाणाऱ्या सर्वात उल्लेखनीय भाषांपैकी एक आहे. स्पॅनिश ही पहिली किंवा दुसरी भाषा म्हणून 470 दशलक्ष पेक्षा जास्त स्थानिक भाषक आणि 548 दशलक्ष स्पॅनिश भाषकांकडून बोलली जाणारी भाषा आहे. ही भाषा 22 देशांमध्ये मातृभाषा म्हणून बोलली जाते. चायनीज आणि इंग्रजी नंतर ही जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने स्पेन, अर्जेंटिना, बोलिव्हिया, चिली, कोलंबिया, कोस्टा रिका, क्युबा, डोमिनिकन रिपब्लिक, इक्वाडोर, पेरू, मेक्सिको, पनामा, पॅराग्वे, व्हेनेझुएला, उरुग्वे आणि पुएर्तो येथे बोलली जाते. स्पॅनिश भाषा आत्मसात केल्याने रोजगाराच्या संधीही खूप वाढतील. तर अशा या भाषेबद्दल जाणून घेऊया….

स्पॅनिश शिकण्याचे फायदे

स्पॅनिश भाषा शिकल्यानंतर तुम्ही अनेक देशांशी कनेक्ट होऊ शकता.
परदेशी शिक्षणासाठी जायचे असल्यास स्पॅनिश भाषा शिकल्यामुळे ते सहज शक्य होते.
स्पॅनिश ही सर्वात सोपी भाषा आहे.
स्पॅनिश भाषा शिकल्यावर तुम्हाला अनेक करिअरच्या संधी निर्माण होतील.
परदेशात विशेषत: स्पॅनिश भाषिक देशांमध्ये तुम्ही करिअर घडवू शकता.
स्पॅनिश शिकल्याने तुमच्या रेझ्युमचा दर्जा वाढेल.

नोकरीच्या संधी

स्पॅनिश भाषेवर प्रभुत्व मिळवल्यावर तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. तुम्हाला स्पॅनिश भाषा शिकल्यावर फक्त परदेशात नाही तर भारतातही अनेक संधी मिळतात. फ्रीलांसर, अनुवादक, दुभाषी, शिक्षक म्हणून काम करू शकता. तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लॉग स्पॅनिशमध्ये सुरू करू शकता. तुम्ही कॉर्पोरेट नोकरी, बीपीओ आणि केपीओ, बँकिंग, पर्यटन मार्गदर्शक, भाषा प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करू शकता.

स्पॅनिश भाषा शिकायच्या पद्धती – स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी ६ पायऱ्या असतात. A१ आणि A २ या मूलभूत पायऱ्या असतात. B१ व B२ या मध्यम पायऱ्या असतात. C१ व c२ हे ऍडव्हान्स कोर्स असतात. तुम्ही C२ पायरी पूर्ण झाल्यावर नक्कीच चांगले स्पॅनिश बोलू शकता.

स्पॅनिश भाषा शिकवणाऱ्या ठाण्यातील संस्था

अकादमी डी इस्पानॉल – अकादमी डी इस्पानॉल ही संस्था १९९८ पासून भारतातील सर्वात जुनी आणि लोकप्रिय स्पॅनिश भाषा शिकवणारी संस्था आहे जी वैयक्तिकृत स्पॅनिश अध्यापन, भाषांतर या सेवा देते. आंतरराष्ट्रीय परीक्षा D.I.E. आयोजित करण्यासाठी त्यांना अधिकृतपणे मान्यताही आहे. सध्या याची ५ केंद्र आहेत. अंधेरी, वांद्रे, ठाणे, चेंबूर आणि बोरिवली येथे या क्लासेसची केंद्रे आहेत. येथे आधुनिक सुविधांमध्ये स्पॅनिश भाषा शिकता येते. अत्याधुनिक वर्गखोल्या प्रोजेक्टर, व्हाईटबोर्ड, एअर कंडिशनिंग आणि वाय-फाय सुविधांनी पूर्णपणे सुसज्ज आहेत. येथे अनुभवी शिक्षक शिकवतात. आत्तापर्यंत त्यांनी ५० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे. या विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. येथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. येथे ५ ते ७५ वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवले जाते. इंटरनॅशनल परीक्षाही येथे घेतल्या जातात. येथे ५०० पेक्षा जास्त स्पॅनिश पुस्तकांचे ग्रंथालय आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे वर्ग नेहमी होत असतात. विविध सेमिनार, चित्रपट स्क्रीनिंग, चर्चासत्र येथे होतात.

अधिक माहितीसाठी संपर्क- 93722 50533

नवीन देशात शिकायला किंवा नोकरीच्या निमित्ताने जाताना थोडी धाकधूक असतेच. भाषा, संस्कृती, राहणीमान सगळेच नवीन असते. पण निदान तेथील भाषा येत असेल तर तुम्हाला त्या देशात रुळायला वेळ लागत नाही. स्पॅनिश भाषा येत असेल तर परदेशात अनेक भागातील संस्कृती तुम्ही लगेच स्वीकारू शकता. अकादमी डी इस्पानॉल क्लासेस जेव्हा सुरु केले तेव्हा लोकांना स्पॅनिश भाषेचे महत्त्व माहितीच नव्हते. त्यावेळी इतर अनेक भाषा लोकांना अवगत होत्या. त्यामुळे संस्थापकांनी स्पॅनिश भाषेचे क्लासेस सुरु करायचे ठरवले. सध्या विद्यार्थी त्याच्या करिअर निवडण्यात गोंधळतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज असते.

(ट्विंकल गोविंदांनी)

अकादमी डी इस्पानॉल या क्लासमधून स्पॅनिश भाषा शिकण्याचा माझा प्रवास हा अविस्मरणीय आहे. यामुळे माझे संपूर्ण जीवनच बदलले. ही भाषा शिकल्यामुळे मला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीमध्ये उच्चपदावर काम करता आले. त्यामुळे मी माझ्या कंपनीच्या जगभरातील स्पॅनिश ग्राहकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधू शकतो. त्यामुळे कंपनीच्या कस्टमर सोबत माझे चांगले संबंध निर्माण झाले. हे सर्व क्लासेसमध्ये स्पॅनिश शिकवण्याच्या पद्धती सोबत त्याच्या तांत्रिक आणि व्यावहारिक ज्ञानामुळे शक्य झाले.

(प्रांजय कोळगे, विद्यार्थी)

स्पॅनिश भाषा शिकल्यामुळे माझे भवितव्य बदलले आहे. मी सध्या एमबीएच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. विद्यार्थ्यांना शिकवताना मला खूप समाधान मिळते. या भाषेमुळे मला करिअरच्या विविध संधी निर्माण झाल्या. या भाषेने मी नवीन संस्कृतीशी कनेक्ट झाले. अकादमी डी इस्पानॉल येथील शिक्षक खूप चांगले शिकवतात. या क्लासमध्ये संभाषणावर लक्ष केंद्रित केले जाते. येथे तुम्हाला करिअरसाठी मार्गदर्शनही केले जाते.

कुंजन मोदी, माजी विद्यार्थी

प्राजक्ताज इन्स्टिट्युट ऑफ फॉरिन लँग्वेजेस

प्राजक्ताज इन्स्टिट्युट ऑफ फॉरिन लँग्वेजेस ही ठाणे, मुंबईमधील एक प्रतिष्ठित अशी परदेशी भाषा क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना 2008 मध्ये गुढी पाडव्याचे दिवशी झाली. येथे फ्रेंच, जर्मन, व स्पॅनिश ह्या भाषा शिकवल्या जातात. येथे भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना वयाची कोणतीही अट नाही. त्याचबरोबर कोर्सची माफक फी, अनुभवी शिक्षक, वातानुकूलित वर्ग- ही काही खास वैशिष्ट्ये असून त्यासोबत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार संशोधित आणि सर्वसमावेशक असे अभ्यासक्रमाचे साहित्य विद्यार्थ्यांना दिले जाते. ऑडियो- व्हिज्युअल अशा दोन्ही माध्यमांतून प्रॅक्टिकल शिक्षणावर अधिक भर दिला जातो. विद्यार्थ्यांसाठी जर्मन, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषेतील पुस्तकांचे ग्रंथालयही येथे आहे. ही संस्था स्पॅनिश भाषेच्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सर्टीफिकेशनच्या परीक्षांचे केंद्र आहे. प्राजक्ता परांजपे ह्या संस्थेच्या संस्थापिका आहेत तर श्री. समीर दामले जर्मन व स्पॅनिश विभागाचे प्रमुख आहेत. ह्या संस्थेची एस. डी. ट्रान्स्लेटर्स ही ट्रांसलेटिंग एजेन्सी आहे. फ्रेंच जर्मन, आणि स्पॅनिश ह्या परदेशी भाषांचे भाषांतराचेही काम येथे केले जाते.

अधिक माहिती साठी संपर्क – 7208649525 / 7208069525

स्पॅनिश भाषा शिकणे हे सध्या अत्यंत गरजेचे आहे. करिअरच्या दृष्टीने आणि प्रोफेशनल दृष्टीकोनातून स्पॅनिश भाषा खूपच उत्तम आहे. कोणतीही भाषा शिकताना आपण नुसतीच भाषा शिकत नाही तर त्यासोबत त्या देशाची संस्कृती, इतिहास, विचार, तत्कालीन परिस्थिती या गोष्टींची माहिती मिळते. आजकाल परदेशी भाषा शिकणं हे जणू काही दुसरं शिक्षणच झाले आहे. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या परदेशी भाषा शिकलेल्यांना नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देतात. स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. हल्ली बरेचजण स्पेन, यूएस आणि इतर अनेक स्पॅनिश भाषा असणाऱ्या देशांमध्ये शिक्षणानिमित्त तसेच व्यवसायानिमित्त जात आहेत. तसेच बरेच स्पॅनिश शो देखील प्रसिद्ध झाले आहेत. ते कळावेत या कुतूहलासाठी देखील अनेक तरुण मंडळी स्पॅनिश भाषा शिकत आहेत.

प्राजक्ता परांजपे,संस्थापिका, प्राजक्ताज इन्स्टिट्युट ऑफ फॉरिन लँग्वेजेस

स्पॅनिश ही जगभरात बोलली जाणारी भाषा असून ती अनेक देशांची मातृभाषा आहे. स्पॅनिश शिकल्याने परदेशात तर संधी मिळतेच पण भारतातही करियरच्या अनेक संधी मिळू शकतात. प्राजक्ताचा परदेशी भाषा संस्था सुरु करण्याचा मुख्य उद्देश परदेशी भाषेकडे लोकांना आकर्षित करण्याचा होता. दिवसेंदिवस परदेशी भाषेचे महत्व वाढतेच आहे. ज्या देशाची मातृभाषा स्पॅनिश आहे तेथे इंग्रजी बोलले जात नसल्याने स्पॅनिश भाषा शिकणे खूप महत्वाचे ठरते. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या देशात लवकर मिसळू शकता.

समीर दामले जर्मन व स्पॅनिश विभागाचे प्रमुख

ठाणे येथील प्राजक्ताज इन्स्टिट्युट ऑफ फॉरिन लँग्वेजेस ही परदेशी भाषा शिकण्यासाठी फारच चांगली संस्था आहे. मला आधीपासूनच स्पॅनिश भाषा शिकण्यात रस होता. म्हणून मी अनेक क्लासेसमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहिले आणि त्यानंतर प्राजक्ताज इन्स्टिट्युट ऑफ फॉरिन लँग्वेजेस यांच्याकडे मला स्पॅनिश भाषा शिकावीशी वाटली. येथील शिक्षक खूप चांगले शिकवतात. या ठिकाणची पायाभूत सुविधा चांगली आणि शिकण्यासाठी पोषक आहे. मला स्पॅनिश भाषा खरोखर खूप सोपी वाटतेय.

पालवी न्यायाधिश, माजी विद्यार्थिनी