डायमंड दुकानाला टाळे लागल्याने ठेवीदार भयभीत
कल्याण : तीन ते ११ टक्के असा परतावा मिळेल असे आमिष देऊन लोकांना गुंतवणूक करण्यास सांगून लोकांनी याच लालचेपोटी १० हजार ते १० लाख अशी गुंतवणूक केली. मात्र आता या कंपनीच्या दुकानाला टाळ लागल्याचे समजताच कल्याणमधील दुकानासमोर गुंतवणूकदारांनी गर्दी केली.
टोरेस नावाची आर्टिफिशल डायमंड विक्री करणारी कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. नागरिकांना उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा करत गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची माहिती समोर आहे. नवी मुंबई, मीरा भाईंदर, दादर पाठोपाठ कल्याणमध्ये देखील टोरेसचे दुकान आज बंद असल्याचे निदर्शनास आल्याने गुंतवणूकदार घाबरले.
आज कल्याणमधील टोरेसच्या दुकानासमोर शेकडो गुंतवणूकदार जमले. फसवणूक करणाऱ्या कंपनी मालकाने दुकान बंद केले आहे, त्यांचे फोन लागत नाही. आमची फसवणूक झाली आहे. या मालकावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी गुंतवणूकदार करत आहेत.