कसोटी: भारत, एकदिवसीय सामने: ऑस्ट्रेलिया, टी-२० मालिका कोण जिंकणार?

Photo credits: X/BCCI Women

भारत-ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमधील मालिका एका रोलर-कोस्टर राईडप्रमाणे उतार चढाव अनुभवत आली आहे. भारताने ऐतिहासिक कसोटी जिंकून सुरुवात केली आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० अशा फरकाने विजय प्राप्त केला. मालिकेच्या अंतिम टप्प्यात हे दोन संघ तीन टी-२० सामने खेळतील आणि शेवट गोड करायचा निर्धार बाळगतील.

नवी मुंबईतील डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे ५ जानेवारी रोजी भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यातील पहिला टी-२० सामना खेळवला जाईल.

 

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्रकार, कनिका अहुजा, मिन्नू मणी

ऑस्ट्रेलिया: एलिसा हिली (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गार्थ, हेदर ग्रॅहम, जेस जोनासन, अलाना किंग, फीबी लिचफिल्ड, बेथ मूनी (यष्टीरक्षक), एलिस पेरी, मेगन शुट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम, ग्रेस हॅरिस

 

टी-२० क्रिकेटमध्ये आमने सामने

भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरुद्ध ३१ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी ऑस्ट्रेलियाने २३ जिंकले आहेत, तर भारताला फक्त सात (एक सुपर ओव्हर विजयासह) जिंकता आले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारतात, ऑस्ट्रेलियाने १२ पैकी १० टी-२० सामने जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या पाच टी-२० सामन्यांपैकी भारताने फक्त एक (सुपर ओव्हरमध्ये) जिंकला आहे.

भारत ऑस्ट्रेलिया
आयसीसी टी-२० रँकिंग
टी-२० क्रिकेटमध्ये आमने सामने २३
भारतात १०
शेवटच्या पाच टी-२० सामन्यांमध्ये

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

स्मृती मानधना: भारताची स्टायलिश डावखुरी सलामीवीर ३००० टी-२० धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. ती महिलांच्या टी-२० मध्ये फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. तिच्याकडून भारताला एका चांगल्या सुरुवातीचा अपेक्षा असेल. तसेच, तिला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे आवडते, त्यांच्याविरुद्ध सहा अर्धशतके नोंदवली आहेत. या स्पर्धकासमोर तिची सरासरी ३० आणि स्ट्राइक रेट १३० आहे. हे आकडे तिच्या टी-२० करीअरच्या आकड्यांपेक्षा जास्त आहेत (सरासरी २७ आणि स्त्रीके रेट १२२).

दीप्ती शर्मा: भारताची प्रतिभावान अष्टपैलू, जी ऑफ-स्पिनर आणि डावखुरी मधल्या फळीतील फलंदाज आहे, ती महिलांच्या टी-२० मध्ये अष्टपैलूंच्या यादीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. तिच्याकडे १०० पेक्षा जास्त टी-२० विकेट्स आणि २००० च्या जवळपास टी-२० धावा असल्यामुळे ती संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये (पॉवरप्ले) आणि त्याचबरोबर अंतिम षटकांमध्ये ती चांगली गोलंदाजी करू शकते.

फीबी लिचफिल्ड: ऑस्ट्रेलियाची ही २० वर्षीय डावखुरी सलामीवीर भारतीय परिस्थीनमध्ये अगदी रमून गेली आहे. मुंबईत भारताविरुद्धच्या तिच्या शेवटच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावून ती उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तिचा एकदिवसीय क्रिकेटमधला फॉर्म टी-२० सामन्यात पण दिसावा अशी अपेक्षा तिचा संघ करेल. तिच्याकडे अनेक कमालीचे शॉर्ट्स आहेत आणि ती मैदानाच्या कुठल्याही बाजूला फटकेबाजी करू शकते.

ऍशले गार्डनर: ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू, जी ऑफ-स्पिनर आणि उजव्या हाताची मधल्या फळीतील फलंदाज आहे, ती कुठलाही सामना आपल्या संघाला एकहाती जिंकून देऊ शकते. डिसेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतात आले होते, तेव्हा तिने ११५ धावा (३ डावात) आणि सात विकेट्स घेतल्यामुळे तिने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला.

 

खेळपट्टी

या ठिकाणी आजपर्यंत फक्त दोन महिला टी-२० सामने खेळले गेले आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हे दोन सामने खेळले गेले. दुसरी फलंदाजी करणाऱ्या संघांनी दोन्ही सामने जिंकले (त्यापैकी एक टाय झाला आणि सुपर ओव्हर पद्धतीने जिंकला). दोन्ही सामन्यांमध्ये उच्च धावसंख्या केली गेली होती. ३५० पेक्षा अधिक धावा प्रत्येकी सामन्यात बघण्यात आल्या. फलंदाजीसाठी अनुकूल परिस्थिती असल्याने आणखी एका उच्च धावसंख्येची अपेक्षा करा.

 

हवामान

तापमान २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहिल्याने हवामान क्रिकेटसाठी अनुकुल राहण्याची अपेक्षा आहे. ढगांचे आवरण राहणार नाही आणि पावसाची शक्यता नाही. पश्चिम-वायव्येकडून वारे वाहतील.

 

माइलस्टोन अलर्ट

  • स्मृती मानधनाला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३००० धावा पूर्ण करण्यासाठी २ धावांची गरज आहे
  • जेमिमाह रॉड्रिग्जला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ७७ धावांची गरज आहे
  • दीप्ती शर्माला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी २९ धावांची गरज आहे
  • जेस जोनासनला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ४ विकेट्सची गरज आहे

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ५ जानेवारी २०२४

वेळ: संध्याकाळी ७ वाजता

स्थळ: डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई

प्रसारण: जिओ सिनेमा

 

Match Preview: https://youtu.be/kpDaH4Dw1Cs