नव्या ऊर्जेने भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला पुन्हा सज्ज

Photo credits: AFP

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या भारताच्या हृदयद्रावक पराभवाच्या जखमा चाहत्यांच्या मनात अजूनही ताज्या असताना, खेळाडूंना मात्र त्यांच्या पुढील असाइनमेंटसाठी सज्ज व्हावं लागेल. २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या पाच टी २० सामन्यांच्या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. पहिला सामना डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे रंगणार आहे. दोन्ही संघांनी नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकात खेळलेल्या बहुसंख्य खेळाडूंना विश्रांती दिली आहे.

 

संघ

भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

(श्रेयस अय्यर शेवटच्या दोन टी २० सामन्यांसाठी संघात सामील होईल आणि उपकर्णधाराची भूमिका स्वीकारेल) 

ऑस्ट्रेलिया: मॅथ्यू वेड (कर्णधार), अॅरॉन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, शॉन अॅबॉट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा.

 

भारत आणि ऑस्ट्रेलिया टी २० क्रिकेटमध्ये आमने सामने

२००७ ते २०२२ दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलियाने एकमेकांविरुद्ध २६ टी २० सामने खेळले आहेत, त्यापैकी १५ भारताने जिंकले आहेत, ऑस्ट्रेलियाने १० जिंकले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारतात, त्यांनी १० टी २० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने सहा आणि ऑस्ट्रेलियाने चार जिंकले आहेत.

 

  भारत ऑस्ट्रेलिया
आयसीसी रँकिंग (टी २० क्रिकेट)
टी २० क्रिकेटमध्ये आमने सामने १५ १०
भारतात

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

सूर्यकुमार यादव: भारताचा उजव्या हाताचा फलंदाज हा टी २० क्रिकेटमध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. नुकत्याच संपलेल्या ५० षटकांच्या विश्वचषकात त्याने जरी सर्वोत्तम खेळ केला नसला तरी जेव्हा टी २० क्रिकेटची वेळ येते तेव्हा तो एक वेगळाच खेळाडू वाटतो. त्याने ५३ आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांमध्ये १७३ च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने १८४१ धावा ठोकल्या आहेत.

अर्शदीप सिंग: भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी-२० मध्ये नवीन चेंडूने उत्कृष्ट कामगिरी करतो. त्याचबरोबर अंतिम षटकांत तो तितकाच प्रभावी आहे. गेल्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून त्याने ३६ सामन्यांमध्ये ५४ विकेट्स घेतल्या आहेत.

ग्लेन मॅक्सवेल: नुकत्याच झालेल्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या यशात या अष्टपैलूचा सिंहाचा वाटा होता. तसेच जेव्हा तो टी-२० खेळायला उतरतो तेव्हा तो अधिक प्रभावशाली असतो कारण हा फॉरमॅट त्याच्या आक्रमक खेळीला अनुकूल आहे. गेल्या १० वर्षांत, त्याने ९८ टी २० सामने खेळले आणि १५१ च्या स्ट्राइक रेटने २१५९ धावा केल्या. त्याचबरोबर त्याच्या नावावर ६६ डावात ३९ विकेट्स आहेत. 

अॅडम झाम्पा: ऑस्ट्रेलियाच्या या चतुर लेग स्पिनरने विश्वचषकात शानदार खेळ केला. त्याने २३ बळी घेतले आणि सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. भारतीय परिस्थितीत मिळवलेल्या यशामुळे तो खूप आत्मविश्वास घेईल. ७३ सामन्यात ८२ विकेट्ससह, तो ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी टी-२० गोलंदाज आहे.

 

खेळपट्टी आणि खेळण्याची परिस्थिती

विशाखापट्टणम येथील डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना होणार आहे. या ठिकाणी तीन आंतरराष्ट्रीय टी-२० सामने आयोजित केले गेले आहेत, ज्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी त्यापैकी दोन जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया येथे २०१९ मध्ये एक टी-२० खेळले ज्यात त्यांनी भारताविरुद्ध १२७ धावांचा लक्ष ३ गाडी राखून साकारला. येथे सर्वाधिक धावसंख्या १७९ आणि सर्वात कमी ८२ आहे. फलंदाजांना मदत करू शकेल अशा नवीन खेळपट्टीची अपेक्षा करा. तथापि, ढगाळ आणि पावसाळी परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरू शकते.

 

हवामान

दुपारी दोन-तीन सरी पडून हवामान दमट राहण्याचा अंदाज आहे. दिवसभरात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. पावसाची ६०% शक्यता आहे. ढगांचे आच्छादन ४७ % असेल. पूर्व-ईशान्येकडून वारे वाहतील.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: २३ नोव्हेंबर २०२३

वेळ: संध्याकाळी ७:००

स्थळ: डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम

प्रसारण: स्पोर्ट्स १८, कलर्स सिनेप्लेक्स, जिओ सिनेमा ऍप

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)