इंग्लंड अ महिलांनी भारत अ महिलांविरुद्ध टी-20 मालिका जिंकली

PC: Getty Images

तीन सामन्यांची टी-20 मालिका बरोबरीत असताना रविवारी खेळ्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये इंग्लंड अ महिला संघानी भारत अ महिला संघाविरुद्ध बाजी मारली.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव 19.2 षटकांत 101 धावांत आटोपला. हा सामना त्याच खेळपट्टीवर खेळला गेला ज्यावर पहिल्या दोन चकमकी झाल्या होत्या. अशा वापरलेल्या खेळपट्टीवर धावा करणे कधीही सोपे नसतं. उमा चेत्री (16 चेंडूत 21 धावा) आणि दिशा कासट (25 चेंडूत 20 धावा) यांनी चांगली खेळी खेळली परंतु इंग्लंड अ महिलांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केल्यामुळे इतर भारतीय फलंदाजांना जास्ती काही करता आले नाही. इस्सी वोंग, कर्स्टी गॉर्डन, मॅडी विलियर्स आणि लॉरेन फाइलर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

प्रत्युत्तरात पाहुण्यांनी सामन्याच्या शेवटच्या षटकात दोन विकेट्स आणि पाच चेंडू शिल्लक ठेवून धावांचा पाठलाग केला. होली आर्मिटेज (28 चेंडूत 27 धावा) हिने कर्णधाराची खेळी खेळली, तर वोंग (30 चेंडूत नाबाद 28), जिने सलग दुसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला, तिने शेवटपर्यंत फलंदाजी करून तिच्या संघाला विजय मिळवून दिला. भारत अ महिला संघाची कर्णधार मिन्नू मणी आणि श्रेयंका पाटील प्रत्येकी दोन विकेट्स पटकावून त्यांच्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरल्या.

शेवटच्या 24 चेंडूत 21 धावा आणि दोन विकेट्स आवश्यक असल्याने सामना संतुलित होता. अखेर इंग्लंड अ संघाने दबावाखाली असताना उत्कृष्ट प्रदर्शन केले.