आत्मविश्वासाने भरलेला भारत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

Photo credits: ICC

रविवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात आठ गडी राखून विजय मिळविल्यानंतर, केबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे मंगळवारी तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत भारत दक्षिण आफ्रिकेशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. भारत पुन्हा विजय मिळवून मालिका जिंकू शकेल? जर भारत हे करू शकला तर ते प्रोटीजविरुद्ध वनडेत सलग पाचव्या विजयाची नोंद करेल.

संघ

भारत: रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, अवेश खान, अर्शदीप सिंग, आकाश दीप.

दक्षिण आफ्रिका: एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली पोन्गवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, तबरेझ शम्सी, रासी व्हॅन  डर डसेन, काइल वेरीने, लिझाड विल्यम्स.

 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 92 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 39 जिंकले आहेत, दक्षिण आफ्रिकेने 50 जिंकले आहेत आणि तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. दक्षिण आफ्रिकेत, त्यांनी 38 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने 11 जिंकले आहेत, दक्षिण आफ्रिकेने 25 जिंकले आहेत आणि दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. ऐतिहासिकदृष्ट्या दक्षिण आफ्रिकेचे भारतावर वर्चस्व असले तरी, अलीकडच्या काळात, भारताने शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यांपैकी चार जिंकले आहेत.

  भारत दक्षिण आफ्रिका
आयसीसी रँकिंग (एकदिवसीय क्रिकेट) 1 3
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने 39 50
दक्षिण आफ्रिकेत 11 25
शेवटचे पाच एकदिवसीय सामने 4 1

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

अर्शदीप सिंग: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा हा डावखुरा वेगवान गोलंदाज त्याच्या सर्वोत्तम कामगिरीवर होता. त्याने 10 षटकात 37 धावा देऊन पाच गडी बाद केले आणि त्याच्या चमकदार गोलंदाजीच्या कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार जिंकला. चौथा एकदिवसीय सामना खेळताना या नवीन चेंडूने गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूने त्याचा पहिला पाच विकेट हॉल पटकावला. तसेच या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर एकही वनडे विकेट नव्हती.

श्रेयस अय्यर: भारताच्या या फलंदाजाने मागच्या महिन्यात भारतात संपन्न झालेल्या विश्वचषकात चांगले प्रदर्शन केले होते. त्याने त्याचा तो फॉर्म दक्षिण आफ्रिकेत देखील आणला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, त्याने 45 चेंडूत 52 धावा ठोकल्या आणि या फॉरमॅटमधील त्याचे 18 वे अर्धशतक नोंदवले. अर्धा डझन चौकार आणि एक षटकार ठोकताना तो उत्कृष्ट लयमध्ये दिसत होता.

टोनी डी झॉर्झी: दक्षिण आफ्रिकेच्या या युवा फलंदाजाने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कडवी झुंज दिली जेव्हा त्याच्या अवतीभोवती विकेट्स पडत होत्या. 20 वर्षीय डाव्या हाताच्या फलंदाजाने 22 चेंडूंत 28 धावा केल्या, त्यात दोन चौकार आणि तेवढ्याच षटकारांचा समावेश होता. तो एक आश्वासक प्रतिभा आहे आणि त्याच्याकडून त्याच्या संघाला फलंदाजीची चांगली सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.

अँडिले फेलुक्वायो: दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलूने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बॅट आणि चेंडूने उपयुक्त योगदान दिले. या डावखुऱ्या फलंदाजाने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 49 चेंडूत 33 धावा करत आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावात टाकलेल्या एकाकी षटकात त्याने एक विकेट घेतली.

 

खेळपट्टी आणि परिस्थिती

या ठिकाणी 42 पुरुष एकदिवसीय सामने आयोजित केले गेले आहेत, त्यापैकी दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी 21 जिंकले आहेत. पहिल्या डावात सरासरी 233 आणि दुसऱ्या डावातील सरासरी 200 धावसंख्या आहे. येथे सर्वाधिक धावसंख्या 335 आणि सर्वात कमी 112 आहे. येथे खेळल्या गेलेल्या 35 पैकी 21 सामन्यांत, दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे तर भारताने त्यांच्या सहा एकदिवसीय सामन्यांपैकी फक्त एक जिंकला आहे. हे ठिकाण विशेषत: जास्त धावसंख्येचे नसल्यामुळे, गोलंदाजांना येथे खेळायला मजा येते. सामन्याच्या दिवशी ढगाळ वातावरण देखील त्यांना मदत करेल, विशेषतः वेगवान गोलंदाजांना.

 

हवामान

सकाळी दोन-तीन सरींची अपेक्षा करा. दिवसाचे कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस राहील. 51% ढगांचे आच्छादन आणि 60% पावसाची शक्यता असेल. पूर्व-आग्नेयेकडून वारे वाहतील.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: १९ डिसेंबर २०२३

वेळ: दुपारी 4.30 वाजता

स्थळ: सेंट जॉर्ज पार्क, केबरहा, दक्षिण आफ्रिका

प्रसारण: डिस्नी + हॉटस्टार अॅप, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क