नेपाळवार मात करून भारत पटकावणार विजयाची हॅट्ट्रिक?

गतविजेत्या भारताने या महिला टी- २० आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत एकही पाऊल चुकीचे टाकलेले नाही. त्यांनी पाकिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला आणि नंतर यूएईविरुद्ध ७८ धावांनी विजय मिळवला. उपांत्य फेरीत जागा निश्चित केलेला भारत, मंगळवारी रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नेपाळविरुद्ध होणाऱ्या लढतीत विजयाचा सिलसिला कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे या स्पर्धेत नेपाळने यूएईविरुद्ध एक सामना जिंकला आहे तर दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध गमावला आहे.

 

आमने-सामने

भारत आणि नेपाळ एकमेकांविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळणार आहेत.

 

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा चेत्री (यष्टीरक्षक), स्मृती मानधना (उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, तनुजा कंवर, सजना सजीवन

नेपाळ: इंदू बर्मा (कर्णधार), काजोल श्रेष्ठा, रुबीना छेत्री, सबनम राय, सीता राणा मगर, राजमती आयरी, पूजा महतो, बिंदू रावल, रोमा थापा, ममता चौधरी, कबिता जोशी, कबिता कुंवर, डॉली भट्टा, कृतिका मरासिनी, समझाना खडका

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

रिचा घोष: भारताच्या या यष्टीरक्षक-फलंदाजने युएईविरुद्धच्या मागील सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिने २९ चेंडूंत नाबाद ६४ धावा केल्या. तिने आपल्या धडाकेबाज खेळीत डझनभर चौकार आणि एक षटकार झळकावले.

दीप्ती शर्मा: भारताची ही ऑफस्पिनर युएईविरुद्धच्या तिच्या गेल्या सामन्यात तिच्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज होती. तिने तिच्या चार षटकात २३ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. डावाच्या वेगवेगळ्या टप्प्यात तिने चांगली गोलंदाजी केली. तिच्या गोलंदाजीसोबतच ती फलंदाज म्हणून सुद्धा सक्षम आहे.

कबिता जोशी: नेपाळच्या या अष्टपैलू खेळाडूने पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या चकमकीत बॅट आणि चेंडूने अमूल्य योगदान दिले. तिने २३ चेंडूत नाबाद ३१ धावा करत संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. चेंडूसह, तिने एक विकेट घेतली आणि तिच्या संघासाठी ती एकमेव विकेट घेणारी गोलंदाज होती.

सीता राणा मगर: नेपाळच्या या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाने पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तिच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. तिने ३० चेंडूंत २६ धावा केल्या, ज्यात तीन चौकारांचा समावेश होता. डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करत ती चेंडूसहही योगदान देऊ शकते.

 

 

खेळपट्टी

या मैदानावरील हा स्पर्धेतील १०वा सामना आहे. काही अपवाद वगळता आतापर्यंत या स्पर्धेत वापरल्या गेलेल्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे तितके सोपे दिसून आलेले नाही. गोलंदाजांनी परिस्थितीचा चांगला उपयोग केला आहे.

 

हवामान

सुमारे २५ अंश सेल्सिअस तापमानासह हवामान प्रामुख्याने क्रिकेटसाठी अनुकूल राहील. ६०% ढगांच्या आच्छादनासह पावसाची फक्त ६% शक्यता आहे.

 

सामन्याची थोडक्यात माहिती’

तारीख: २३ जुलै २०२४

वेळ: सायंकाळी ७:०० वाजता

स्थळ: रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, डंबुला

प्रसारण: डिस्नी + हॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स