टीजेएसबीच्या १४२व्या घोडबंदर आनंदनगर शाखेचे उदघाटन

ठाणे: नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात देशात अग्रणी असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेच्या १४२व्या शाखेचे उदघाटन सोमवार ५ ऑगस्ट रोजी ठाणे येथील घोडबंदर मार्गावरील आनंदनगर येथे झाले.

ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, प्रथितयश डॉक्टर अजय ठक्कर हे उदघाटक म्हणून उपस्थित होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, उपाध्यक्ष वैभव सिंगवी, व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराली उपस्थित होते.

टीजेएसबी सहकारी बँकेची १४२वी शाखा शॉप क्रमांक तीन ए सॉलिटेर हाऊसिंग सोसायटी, कॉसमॉस ज्वेल्स, घोडबंदर मार्ग, आनंद नगर, कावेसर, डी-मार्ट जवळ, घोडबंदर रस्ता, ठाणे पश्चिम येथे कार्यान्वित झाली आहे. या शाखेतून सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

उदघाटक डॉ. अजय ठक्कर यांनी बँकेच्या विस्ताराचे कौतुक केले. आपल्या टीजेएसबीच्या ग्राहक सेवेबद्दलच्या दीर्घ अनुभवाविषयी गौरव उदगार काढले. डॉ. अजय ठक्कर यांनी बँकेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

उदघाटनाच्या प्रसंगी बोलताना बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी भविष्यातील योजनांची माहिती दिली. टीजेएसबी बॅंक तंत्रज्ञानात अग्रेसर आहे असे सांगितले. बँकेच्या नवीन प्रणाली मधून ग्राहकांना ईनडायरेक्ट टॅक्स भरण्याची सुविधा देणार आहोत तसेच, टीजेएसबी बॅंकेत लवकरच दोन बँकांचे विलीनकरण होऊन बँकेचा विस्तार होणार आहे अशी माहिती दिली. नवीन घोडबंदर मार्गावरील आनंदनगर शाखेचे व्यवस्थापक प्रशांत इंगवले यांनी आभार प्रदर्शन केले.