दिखाव्याच्या कारवाईने वेळ आणि पैसा दोन्ही वाया?
नवी मुंबई: नवी मुंबई शहरात वाढत्या अनधिकृ त बांधकामांवर सिडको आणि मनपामार्फ त तोडक कारवाई करण्यात येते. मात्र यातील बहुतांश ठिकाणी कारवाईचा
फक्त फार्स दाखवला जात असून दिखाव्याच्या कारवाया के ल्या जात आहेत. मात्र कारवाई के लेली अतिक्रमणे पुन्हा सुरू होत असल्याने अशा कारवाईत महापालिके चा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत आहे. त्यामुळे कारवाई के लेली जागा मनपा किं वा सिडकोने सिल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रात नवीन शहर वासवण्यासाठी सिडकोने येथील जमीन संपादित के ली आहे.त्यामुळे येथील जमीन मालक म्हणून आज सिडको दाखवत आहे. नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिका आहे, मात्र आजघडीला शहरात याच मनपा आणि सिडको अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेसुमार अनधिकृ त बांधकामे उभी राहिली आहेत. यावर ठोस कारवाई करण्याची गरज आहे. मात्र न्यायालयात कागदी घोडे नाचवण्यासाठी मनपा आणि सिडकोमार्फत अशा बांधकामांवर कारवाईचा दिखावा के ला जात आहे. कारवाईनंतर दसु ऱ्या दिवशी हे उघड होत आहे.
नुकतीच तुर्भे विभागात मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमण विभागामार्फ त कार वा ई करण्यात आली. मात्र अनधिकृ त बांधकामात आधीच हाथ ओले के ल्याने सदर बांधकामाची फक्त एक पायरी तोडण्याचे सौजन्य पार पाडण्यात आले. हिच अवस्था इतर विभागात देखील आहे. त्यामुळे मनपा आणि सिडकोने अनधिकृ त बांधकामांवर सरसकट कारवाई करून ती जागा सिडकोने आपल्या ताब्यात घेतल्यास पुढे अनधिकृ त बांधकामांना चाप बसेल. असले भूखंड भविष्यात नागरी सुविधांसाठी वापरात आणता येऊ शकतील. त्यामुळे अशी अतिक्रमणे सिल करून ती जागा ताब्यात घ्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मनपा व सिडकोमार्फत अनधिकृ त बांधकामांवर कारवाई करताना ती फक्त दिखाव्यासाठी के ली जाते का? कारण कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी बांधकामे पुन्हा सुरू झालेली
असतात. त्यामुळे कारवाई करताच ती जागा सिडको आणि महापालिके ने सिल के ली पाहिजे, जेणेकरून दबु ार बांधकाम होणार नाही, अशी मागणी सामाजिक
कार्यकर्ते सुखदेव पाटील यांनी के ली आहे.