नवी दिल्ली : आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सोमवारी भारताच्या १८ सदस्यीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. अनुभवी मध्यरक्षक मनप्रीत सिंगकडे या संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंगची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
‘हॉकी इंडिया’कडून बर्मिगहॅम येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असलेला संघ निवडण्यात आला आहे. २८ जुलैपासून रंगणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घाना यांच्यासह ‘ब’ गटात समावेश असेल. दोन वेळा रौप्यपदक विजेता भारतीय संघ ३१ जुलैला घानाविरुद्ध सलामीचा सामना खेळेल.
संघ
गोलरक्षक : पीआर श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक
बचावपटू : वरुण कुमार, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (उपकर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग, जर्मनप्रीत सिंग
मध्यरक्षक : मनप्रीत सिंग (कर्णधार), हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंग, आकाशदीप सिंग, निलाकांत शर्मा
आघाडीपटू : मनदीप सिंग, गुरजंत सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक