गोपीकृष्ण संगीत महोत्सव ११ व १२ ऑक्टोबर रोजी

ठाणे: दरवर्षी श्री गणेश कल्चरल अकॅडमीच्या माध्यमातून नटराज गोपीकृष्ण संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षी हा महोत्सव ११ अणि १२ ऑक्टोबर रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे साजरा होणार आहे.

ठाण्यातील ज्येष्ठ कथ्थक गुरु डॉ. मंजिरी देव आणि प्रतिभाशाली तबलावादक तालमणी पं. मुकुंदराज देव यांचे गुरू महान कथ्थक नर्तक कै. पंडित गोपीकृष्ण ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा महोत्सव आयोजित केला जातो.

शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८:३० वाजत रूद्रशंकर मिश्रा यांचे कथ्थक नृत्य आणि डॉ. संगीता शंकर, रागिणी शंकर व नंदिनी शंकर यांचे व्हायोलिन सादरीकरण होणार आहे.
दुसऱ्या दिवशी, शनिवार १२ ऑक्टोबर रोजी, कार्यक्रम सायंकाळी ५ वाजत सुरू होणार असून, त्यात प्रियांका शिंदे, प्रिया देव, तेजश्री मुळे यांचे कथ्थक ट्रायो; शाकीर खान यांचे सतारवादन त्यांना तबला संगत रोहीत देव करणार आहेत; त्यानंतर तबला जुगलबंदी उस्ताद अक्रम खान आणि पं. मुकुंदराज देव आणि या वर्षी महोत्सवाची सांगता जेष्ठ गायक पद्मश्री पं. उल्हास कशाळकर यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे. या महोत्सवाचे सहप्रायोजक पीतांबरी आणि सहयोगी प्रायोजक सुमन म्युझिक आहेत.

तिकीट काशिनाथ घाणेकर ऑडिटोरियम, बूक माय शो आणि वेवज् म्युझिकल वर उपलब्ध आहेत. आधिक माहितीसाठी ९७०२०२९१७५ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.