खेलो इंडिया स्पर्धेत एसएसटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी

कल्याण : विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्यांना वाव देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे दरवर्षी खेलो इंडिया स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदाच्या सहाव्या खेलो इंडिया स्पर्धा या तामिळनाडू येथे नुकत्याच झाल्या. या स्पर्धांमधील खो-खो या क्रीडा प्रकारात एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कल्याणी कंक आणि दिव्या गायकवाड यांची मुलींच्या संघात तर वैभव मोरे आणि रामचंद्र झोरे याची मुलांच्या संघांमध्ये करण्यात आली.

या विद्यार्थ्यांनी आपली निवड सार्थ ठरवत मुलींनी आणि मुलांच्या संघाने सुद्धा अंतिम सामन्यात झुंज देत आपल्या संघाला सुवर्णपदक प्राप्त करून दिले. महाराष्ट्र संघाचे कोच म्हणून नरेंद्र मेंगल यांनी तर महाविद्यालयाचे कोच प्रताप शेलार यांनी उत्तम कामगिरी पार पाडली. या यशाबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापन प्राचार्य, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना पदका सोबतच रोख रक्कम ही केंद्र सरकारकडून देण्यात येते.