बच्चेकंपनीच्या खोलीला द्या नवा लूक

तुमच्या मुलाच्या बेडरूमला वैयक्तिक स्पर्श देण्यास विसरू नका. मुलांच्या आवडत्या कलाकृती किंवा आवडते फोटो भिंतींवर प्रदर्शित करा. त्याच्या आवडत्या पोस्टर्स आणि प्रिंट्ससाठी गॅलरी वॉल तयार करा. अथवा पलंगापाठील भिंतीवर त्याचा स्वतःचा फोटो असलेले पोस्टरही लावू शकता. तसेच खोलीला एक आरामदायक गालिचा जोडा. ब्लँकेट व बिछान्यावर त्याच्या आवडीच्या कार्टून्सची चित्रही असूद्या.

तुमच्या मुलाच्या पसंतीनुसार त्याच्या खोलीत साध्या रंगाऐवजी वॉलपेपर्सचा वापरही करू शकता. वॉलपेपर्सवर विविध कार्टून्स, झाडे, पानेफुले असलेले वॉलपेपर्स नेहमीच मुलांना आकर्षित करतात.

दुकाने :
वॉलप्रो – वॉलप्रो येथे लहान मुलांच्या बेडरूममध्ये वापरले जाणारे विविध प्रकारचे वॉलपेपर्स मिळतात. यात लहान मुलांच्या आवडीची कार्टून्स, प्राणी, मासे, अंतराळातील काही दृश्य अशी चित्र असलेले वॉलपेपर्स येथे मिळतात.
कुठे – नौपाडा,ठाणे( प.)

ताहा डेकोर – या दुकानात लहान मुलांसाठी विविध डिझाइन्सचे वॉलपेपर उपलब्ध आहेत. लहान मुलांमध्ये ट्रेंडिंग असणारे सुपरहिरो, जंगल अशा विविध थीमचे वॉलपेपर्स येथे मिळतात. तसेच तुम्ही येथून वॉलपेपर्स कस्टमाइस्ड सुध्दा करून घेऊ शकता .
कुठे – खोपट, ठाणे( प.)

ऑर्बिट इंटेरियर – येथे लहान मुलांच्या बेडरूमसाठी वापरले जाणारे विविध वॉलपेपर्स मिळतात. विविध कार्टून्स , अंतराळातील थीम असलेले वॉलपेपर्स, लहान मुलांच्या आवडीच्या रंगांचे वॉलपेपर्स येथे उपलब्ध आहेत.
कुठे – कोकणीपाडा, ठाणे (प.)