ठाणे जिल्ह्यात ९२ टक्के निकाल
ठाणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. सर्वाधिक ९७.५१ टक्के निकाल कोकण विभागाचा, तर मुंबई विभागाचा सर्वांत कमी ९१.९५ टक्के निकाल लागला. कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात ९२.०८ टक्के निकाल लागला असून मुलांचा ९०.२३ टक्के तर मुलींचा ९४.०७ टक्के निकाल लागला.
ठाणे जिल्ह्यात ९८,००२ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी ९७,६६२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात ५०,५९३ मुलगे तर ४७,०६९ मुलींचा समावेश होता. परीक्षेत ८९,९३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण ९२.०८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ४५,६५५ मुलगे तर ४४,२८० मुलींचा समावेश होता.
कल्याण ग्रामीण भागात १८५२ विद्यार्थ्यांपैकी १७७९ विद्यार्थी उत्तीर्ण (९६.०५टक्के) झाले. अंबरनाथमध्ये ४३३० विद्यार्थ्यांपैकी ४००५ विद्यार्थी उत्तीर्ण (९२.४९ टक्के) झाले. भिवंडीत २८३९ विद्यार्थ्यांपैकी २५३२ विद्यार्थी उत्तीर्ण (८९.१८ टक्के) झाले. मुरबाडमध्ये १९६५ विद्यार्थ्यांपैकी १९२६ विद्यार्थी उत्तीर्ण (९८.०१ टक्के) झाले. शहापूरमध्ये ३६६८ विद्यार्थ्यांपैकी ३४०४ विद्यार्थी उत्तीर्ण (९२.८० टक्के) झाले. ठाणे महापालिका क्षेत्रात २०,५४० विद्यार्थ्यांपैकी १८,९८२ विद्यार्थी उत्तीर्ण (९२.४१ टक्के) झाले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १५,६४९ विद्यार्थ्यांपैकी १४,६६४ विद्यार्थी उत्तीर्ण (९३.७० टक्के) झाले. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात ७९६५ विद्यार्थ्यांपैकी ७४४७ विद्यार्थी उत्तीर्ण (९३.४९ टक्के) झाले.
कल्याण डोंबिवलीतील २१,७२० विद्यार्थ्यांपैकी १९,५७५ विद्यार्थी उत्तीर्ण (९०.१२ टक्के) झाले. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात ९,२७६ विद्यार्थ्यांपैकी ८,४२३ विद्यार्थी उत्तीर्ण (९०.८० टक्के) झाले आणि भिवंडी महापालिका क्षेत्रात ७,८५८ विद्यार्थ्यांपैकी ७,१९८ विद्यार्थी उत्तीर्ण (९१.६० टक्के) झाले.