काय गुजरात जायंट्स मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला विजय नोंदवेल?

बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा १९ धावांनी पराभव करताना गुजरात जायंट्सने अखेर या वूमेन्स प्रीमियर लीग (WPL २०२४) मध्ये विजयाची नोंद केली. पाच सामन्यांमधला हा त्यांचा पहिला विजय होता. त्यांनी दोन गुणांसह त्यांचे खाते उघडले असेल परंतु तरीही ते गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानावर आहेत. शनिवारी त्यांचा सामना सहा सामन्यांत आठ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सशी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

 

 

 

WPL मध्ये आमने सामने

 

मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांनी एकमेकांविरुद्ध तीन सामने खेळले असून त्या तिन्ही सामन्यांत मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे.

 

 

संघ

मुंबई इंडियन्स: हेली मॅथ्यूज, नॅट सिव्हरब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), अमेलिया कर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक, क्लोई ट्रायॉन, जिंतिमनी कलीता, अमनदीप कौर, हुमैरा काझी, इस्सी वोंग, प्रियांका बाला, फातिमा जाफर

गुजरात जायंट्स: बेथ मुनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), वेदा कृष्णमूर्ती, फीबी लिचफील्ड, हरलीन देओल, ॲश्ले गार्डनर, दयालन हेमलता, स्नेह राणा, तनुजा कंवर, कॅथरीन ब्राइस, लीआ ताहुहू, मेघना सिंग, लॉरा वोल्वार्ड, सायली सतघरे, मन्नत कश्यप, शबनम शकील, प्रिया मिश्रा, त्रिशा पूजिता, तरन्नुम पठाण

 

 

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

नॅट सिव्हरब्रंट: या मुंबई इंडियन्सच्या अष्टपैलू खेळाडूने यूपी वॉरियर्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिने 31 चेंडूंत आठ चौकारांसह सर्वाधिक 45 धावा केल्या आणि दोन षटकांत 14 धावा देऊन दोन गडी बाद केले. तिने सलग दोन चेंडूंवर त्या विकेट्स पटकावल्या.

सायका इशाक: मुंबई इंडियन्सच्या या डावखुऱ्या फिरकीपटूने यूपी वॉरियर्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात WPL 2024 मधील तिचे सर्वोत्तम गोलंदाजीची आकडे नोंदवले. तिने शबनीम इस्माईलसह गोलंदाजीची सुरुवात केली आणि चार षटकात 27 धावा देऊन तीन गडी बाद केले. कर्णधार हरमनप्रीत कौरने डावाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तिचा वापर केला.

बेथ मुनी: गुजरात जायंट्सच्या कर्णधाराने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला. या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाने 51 चेंडूत एक डझन चौकार आणि एका षटकारासह अपराजित 85 धावा ठोकल्या. या WPL 2024 मधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे

लॉरा वोल्वार्ड: गुजरात जायंट्सच्या या उजव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 45 चेंडूत 76 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. तिने तिचा सलामीवीर मुनीसोबत 140 धावांची भागीदारी रचली. वोल्वार्डने तिच्या मनोरंजक खेळीत 13 वेळा सीमारेखा पार केली.

 

 

 

खेळपट्टी

आतापर्यंत, या WPL 2024 मध्ये या ठिकाणाने चार सामने आयोजित केले आहेत आणि सर्व चार सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. येथे केलेली सर्वाधिक धावसंख्या 199 आहे आणि सर्वात कमी 118 आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी चारपैकी तीन सामन्यांमध्ये 150 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. फलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल दिसत असताना, फिरकीपटुंनासुद्धा या खेळपट्टीवर मदत मिळाली आहे.

हवामान

96% ढगांच्या आच्छादनासह हवामान खूपच ढगाळ असेल. पावसाची शक्यता नाही. तापमान 17 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. आर्द्रता 42% असेल.

 

 

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: 9 मार्च 2024

वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता

स्थळ: अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

प्रसारण: जिओ सिनेमा, स्पोर्ट्स 18