ठाणे: ठाणे परिवहन सेवेच्या वातानुकूलित बसचे भाडे कमी करण्यास प्रादेशिक परिवहन विभागाने मान्यता दिल्यामुळे उद्यापासून दहा रुपयात ठाणेकरांना गारेगार प्रवास करण्यास मिळणार आहे.
ठाणे परिवहन सेवेत व्होल्व्हो, सीएनजी आणि इलेक्ट्रॉनिक अशा एकूण ३० बस आहेत. या बस बोरिवली मार्गावर धावतात. परिवहन समितीने इलेक्ट्रॉनिक बसचे भाडे १० रुपये केले होते. आता सर्वच वातानुकूलित बसचे भाडे १० रुपये किमान तर कमाल ६५ रुपये इतके करण्यात आले आहे, त्यामुळे ठाणेकरांना गर्मीच्या दिवसात गारेगार प्रवास करता येणार आहे.
असे असतील तिकीट दर
किलोमीटर पुर्वीचे दर सुधारीत दर
०-२ २० १०
२-४ २५ १२
४-६ ३० १५
६-८ ३५ १८
८-१० ४० २०
१०-१४ ५० २५
१४-१६ ५५ २५
१६-२० ६५ ३०
२०-२२ ७५ ३५
२२-२४ ७५ ४०
२४-२६ ८० ४५
२६-३० ८५ ५०
३०-३४ ९५ ५५
३४-३६ १०० ६०
३६-३८ १०५ ६०
३८-४० १०५ ६५