बोलबच्चन टोळीच्या चार जणांना अटक

भाईंदर: मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालय पोलिसांशी संलग्न असलेल्या गुन्हे शाखा युनिट (झोन III) ने लोकांना-विशेषत: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना लुटण्यासाठी कुख्यात ‘बोल-बच्चन’टोळीशी संबंधित चार जणांना अटक केले आहे. बोल-बच्चनचे सदस्य (ग्लिब टॉकर) हे समोरच्या व्यक्तीला संभाषणात गुंतवून फसवणूक करीत होते.

बोलबच्चन टोळीने नुकतीच एका ५९ वर्षीय महिलेची एक लाख रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली होती. दागिने चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाल्याने गुन्हे शाखा सावध झाली आहे. समांतर तपास आणि आरोपींना अटक करण्यासाठी गुन्हे शाखा युनिटतर्फे सायबर विभागासही सामील करण्यात आले.
क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेरे, इलेक्ट्रॉनिक माहिती देणाऱ्या, यंत्रणेद्वारे टिपलेल्या चित्रीकरणाच्या आधारे टीमद्वारे पाळत ठेवून व विश्लेषण करुन आणि महत्त्वपूर्ण माहिती गुन्हे शाखा विभागाकडे सोपवली.

पोलिस निरीक्षक प्रमोद बधाख यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी टोळीतील चार सदस्यांना अटक केली. शंकर राय (३७), नथुराम सिलवट (37), सचिन राठोड (22) आणि राजू राय (२५) सर्व मूळ उत्तर प्रदेशचे रहिवासी होते तर सध्या ते बोईसर येथे वास्तव्यास आहेत.

नालासोपारा आणि विरार येथे अशाच दोन गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची कबुली देणाऱ्या चौकडीच्या ताब्यातून पोलिसांनी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.